विराटने महिलादिनी लेकीला दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला आईसारखं..

मुंबई | ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध क्षेत्रात काम करून नावलौकिक मिळवणाऱ्या महिलांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना गौरवण्यात येते. महिला दिनी अनेकजण सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीनेही महिला दिनी शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. विराटच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

विराटने म्हटले आहे की, बाळाला जन्म देताना पाहणे सोपे नाही. हा प्रत्येकासाठी अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव असू शकतो. जेव्हा आपण हे पाहाल तेव्हा आपल्याला महिलांचे खरे सामर्थ्य आणि देवत्व समजेल. देवाने त्यांच्यामध्ये जीवन का निर्माण केले हे आपणास समजले आहे. कारण त्या आमच्यापेक्षा सामर्थ्यवान आहेत.

माझ्या आयुष्यातील सर्वात बळकट आणि कोमल मनाच्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जी पुढे आपल्या आईसारखी होणार आहे. तिलाही खुप खुप शुभेच्छा. आणि जगातील सर्व महिलांनी महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी वर्षाची सुरूवात अत्यंत आनंदाने झाली होती. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी मुलीचे नाव ‘वामिका’ ठेवलं आहे.

‘वामिका’ या नावाचा अर्थ ‘दुर्गा’ असा आहे. वामिका हे दुर्गा देवीचं आणखी एक नाव आहे. विराट- अनुष्काच्या घरात एका चिमुकलीने आगमन केल्यामुळे ती देवीचं रुप आहे असं म्हणत त्यांनी या चिमुकलीचं नाव वामिका ठेवले आहे.
महत्वाच्या बातम्या-
करिअरसाठी रश्मीका मंदानाने सोडले होते प्रेमाला; तोडला साखरपुडा
वेटर म्हणाला डोळे दुखतात, अन् तात्याराव लहानेंनी हॉटेलमध्येचं केली उपचाराला सुरूवात
वा रं मर्दा! आर्चीचा परश्या उतरला कुस्तीच्या मैदानात, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.