विराटला त्याच्या पदावर राहू द्या, आपल्या संस्कृतीत दोन कर्णधार होऊ शकत नाही; कपिलने सुनावले

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव याने सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावर भाष्य केले आहे. आयपीएलपासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बदलण्याची गरज अनेकांनी बोलून दाखवली आहे.

कपिल देव म्हणाले, आपल्या संस्कृतीत असे होऊ शकत नाही. एखाद्या कंपनीत दोन मुख्य कार्यकारी अधिकारी असतात का?, नाही. कोहली टी20 खेळत असेल आणि चांगली कामगिरी करत असेल, तर तर त्याला कर्णधारपदावर राहू द्या. तथापि इतर खेळाडूंनाही पुढाकार घेताना मला पाहायचे आहे. पण ते कठीण आहे, असे यावेळी ते म्हणाले.

तसेच सध्याच्या टीममध्ये तीनही प्रकारात 70 ते 80 टक्के भारतीय संघ एकसारखाच आहे. संघाला भिन्न मतांचा कर्णधार आवडत नाही. जर तुम्ही दोन कर्णधार ठेवले, तर कसोटीत तो माझा कर्णधार होईल, म्हणून मी त्याला नाराज करणार नाही’ असा विचार काही खेळाडू करू शकतात, असेही पुढे बोलताना कपिल देव म्हणाले.

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावले. आयपीएलमधील मिळालेल्या उत्तुंग यशामुळे त्याची भारतीय टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक करावी ही मागणी जोर धरू लागली आहे. अनेक खेळाडूंनी तशी मागणी केली आहे.

माजी कर्णधार दिग्गज अष्टपैलु कपिल देव यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. यामुळे पुढे काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.