ट्वेंटी पाठोपाठ विराट कोहली ‘या’ फॉर्मॅटमधील कर्णधारपदही सोडणार; स्वत:च केली घोषणा

आयपीएल 2021 नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा विराट कोहलीने रविवारी केली. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ जारी करून याची घोषणा केली. मात्र, त्याने शेवटच्या सामन्यापर्यंत बेंगळुरू संघाकडून खेळण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट केले आहे.

विराटने अलीकडेच भारतीय टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. टी -20 विश्वचषकानंतर आपण भारतीय संघ 20 चे कर्णधारपद सोडणार असल्याचे त्याने सांगितले होते.

आरसीबीचा कर्णधार म्हणून हा माझा शेवटचा हंगाम असल्याचे व्हिडिओमध्ये कोहली म्हणाला. तो म्हणाला, ‘मी व्यवस्थापनाशी आज संध्याकाळी बोललो. हे काही काळ माझ्या मनात चालू होतं. मी माझ्या कामाचा ताण सांभाळण्यासाठी अलीकडेच भारतीय टी -20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.

कोहली पुढे म्हणाला, ‘मला देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मला तयार राहायचे होते. आणि मला वाटले की या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मला कसे पुढे जायचे आहे याबद्दल मला माझ्या विचारांमध्ये स्पष्ट व्हायचे आहे. “त्याच वेळी पुढील वर्षी एक मोठा लिलाव आहे आणि आरसीबी संक्रमण कालावधीतून जाईल,”असेही तो म्हणाला.

कोहलीने असेही स्पष्ट केले की तो बेंगळुरूसाठी खेळत राहील. तो म्हणाला, ‘मी व्यवस्थापनाला स्पष्ट केले आहे की मी आरसीबी व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघासाठी खेळण्याचा विचारही करू शकत नाही.

आयपीएलमधील माझ्या शेवटच्या सामन्यापर्यंत मी आरसीबीकडून खेळत राहीन. पण कर्णधार म्हणून नऊ वर्षांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता.  आनंदाचे, दु: खाचे, उत्साहाचे ते क्षण होते असे तो म्हणाला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.