आयपीएलच्या समाप्तीनंतर विराट कोहली युवा सेनेसोबत उतरणार कोरोना लढ्यात

मुंबई |  देशभरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आयपीएलमध्येही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने ही स्पर्धा रद्द केली आहे.

अशातच भारतीय संघाचा खेळाडू आणि  आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने कोरोनाविरोधात लढण्यासाठी  पुढं येण्याचं ठरवलं आहे. कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी विराट कोहली युवा सेनेसह पुढाकार घेणार आहे.

युवा सेनेचे पदाधिकारी राहूल कनाल यांनी विराट कोहलीची भेट घेत त्याचे कौतूक केले आहे. कनाल यांनी ट्विट करत म्हटले की, आज आपल्या कॅप्टनची भेट घेतली. कोरोनाविरोधात त्याने जे युध्द छेडले आहे, ते पाहून त्याच्या प्रती आदर आणि प्रेम वाढले.

त्याच्या प्रयत्नांना यश मिळो, हीच प्रार्थना असं कनाल यांनी म्हटलं आहे. युवा सेनेचे राहूल कनाल आणि विराट कोहलीने मंगळवारी कोरोनाविरूध्द लढण्याबाबत चर्चा केली. सोशल मिडियावर दोघांच्या चर्चेचे फोटो व्हायरल झाले आहेत.

विराट कोहलीने कोरोना विरुध्दच्या लढ्यात पंतप्रधान सहाय्यता निधीत मदत केली आहे. आयपीएलमध्ये विराटच्या संघातील युवा खेळाडू देवदत्त पडिक्कल याला कोरोनाची लागण झाली होती. यामुळे विराट सेनेला धक्का बसला होता.

आयपीएलच्या १४ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर फॉर्ममध्ये मैदानात उतरली होती. या हंगामात सात सामन्यांपैकी पाच सामने आरसीबीने जिंकले होते. आतापर्यंत एकदाही  ट्रॉफीवर आरसीबीला नाव कोरता आलं नाही. मात्र यावर्षीची आरसीबीच्या खेळाडूंंची आक्रमक खेळी पाहून चाहत्यांच्या भूवया उंचावल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-
“देशाला कोरोनाविरुद्ध लढायचे असेल तर महाराष्ट्र मॉडेलचा वापर करावाच लागेल”
एवढ्या दबावात मला क्रिकेट खेळणं जमणार नाही; भारतीय संघाच्या खेळाडूने सांगीतला धक्कादायक अनुभव
‘बिग बॉस १४’ स्पर्धक अभिनेत्रीच्या मनात आला होता आत्महत्येचा विचार, ‘ अश्या प्रकारे केली नैराश्यावर मात!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.