आयपीएल २०२२ मध्ये काल राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा आयपीएल २०२२ मधील प्रवास संपला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खेळाडू विराट कोहली लवकर बाद झाला. पण या सामन्यात विराट कोहलीने(Virat Kohli) एका कृतीमुळे करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत.(virat kohli video viral on social media)
राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खेळाडू विराट कोहलीने ८ चेंडूत केवळ ७ धावा केल्या. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विराटने एक धाव घेतली. त्यावेळी जोस बटलरने चांगले क्षेत्ररक्षण केले आणि नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने थ्रो केला.
त्यावेळी चेंडू कोहलीच्या पॅडला लागून लाँग ऑनच्या दिशेने गेला. पण यावेळी विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवत धाव घेण्यास नकार दिला. विराट कोहलीचे क्रिकेट स्पिरिट पाहून चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे. कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सात गडी राखून रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा पराभव केला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने २० षटकांत १५७ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १५८ धावांची गरज होती. राजस्थान रॉयल्सने १८.१ षटकातच १५८ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. राजस्थान रॉयल्स संघाकडून जॉस बटलरने शतक ठोकत १०६ धावा केल्या.
— Tumchi Gosht (@TumchiGosht) May 28, 2022
आयपीएल २०२२ च्या संपूर्ण हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खेळाडू असलेल्या विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीने आयपीएल २०२२ मधील १६ सामन्यांमध्ये २२.७३ च्या सरासरीने ३४१ धावा केल्या आहेत. या संपूर्ण हंगामात विराट कोहलीने केवळ २ अर्धशतके केली आहेत.
आयपीएल २०२२ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची सुरवात चांगली झाली होती. पण हंगामातील शेवटच्या काही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने आयपीएल २०२२ मधील १४ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले. उर्वरित ६ सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला पराभव स्वीकारावा लागला.
महत्वाच्या बातम्या :-
लडाखमध्ये ६० फुट खोल दरीत कोसळली २६ जवानांची बस, ७ जणांचा मृत्यू; देशात खळबळ
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातील रणदीप हुडाचा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रेक्षकांमध्ये चर्चा
कालिन भैया की बाबा निराला, कोण आहे ओटीटीचा बादशाह? कोण घेतं सगळ्यात जास्त मानधन?






