…नाहीतर तुम्हीपण कोहलीसारखं शुन्यावर आउट होऊ शकता, उत्तराखंड पोलिसांकडून कोहली ट्रोल

मुंबई | इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शुन्यावर माघारी परतला. यावर उत्तराखंड पोलिसांनी विराटला ट्रोल करत एक खास संदेश देणारे ट्विट केले आहे.

उत्तराखंड पोलिसांकडून एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये विराटचा आउट होऊन परत जातानाचा फोटो दिला आहे. याशिवाय बाजूला खास संदेश लिहिला आहे. उत्तराखंड पोलिसांचा हा संदेश वाहनचालकांसाठी आहे.

ट्विट करत पोलिसांनी रस्ते वाहतुकीचा नियम उदाहरणासह सागिंतला आहे. पोलिस सांगतात, फक्त हेलमेट लावणंच गरजेचं नाही तर पुर्ण शुद्धीत सावधानतेने गाडी चालवणं गरजेच आहे. अन्यथा कोहलीसारखं तुम्ही शुन्यावर आउट होऊ शकता.

उत्तराखंड पोलिसांनी हे ट्विट करताच ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. पोलिसांनी एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी लढवलेली शक्कल यशस्वी ठरली.

दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहली २०१८ नंतर खेळलेल्या २६ टी-२० सामन्यात प्रथमच भोपळ्यावर माघारी परतला आहे. तर २०२१ मध्ये सर्वाधिक ३ वेळा भोपळ्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम  विराटच्या नावावर आहे.

याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावार बाद होण्याच्या भारतीय क्रिकेटरच्या यादीत विराट चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर(३४), वीरेंद्र सेहवाग(३१), सौरव गांगुली(२९), विराट कोहली(२८) आणि युवराज सिंग (२६) असे सुरुवातीचे पाच फलंदाज आहेत.

महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतने जोफ्रा आर्चरला मारलेला डोळ्याचं पारणं फेडणारा रिव्हर्स स्विपचा षटकार पाहीलात का?
वीरेंद्र सेहवागची तुफान फटकेबाजी, पहिल्याच चेंडूवर चौकार तर षटकार खेचत अर्धशतक; पहा व्हिडीओ
खोटं खेळून सेहवागचे शतक हुकवणाऱ्या खेळाडूवर आता आलीय ड्रायव्हरची नोकरी करून पोट भरण्याची वेळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.