बहुप्रतिक्षित टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात शुक्रवार २७ नोव्हेंबरपासून झाली. सिडनीमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ रनने पराभव केला. सिडनीमधला पराभव कर्णधार विराट कोहलीसाठी कारकिर्दीतला सगळ्यात वाईट दिवसही ठरला. परंतु त्याने पराभवाचे खापर संघावर फोडलं आहे.
विराट कोहली सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, “मालिका सुरु होण्यापूर्वी सराव करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळाला होता. पराभवासाठी कोणतेही कारण शोधत नाही. आम्ही मोठ्या कालावधीपासून टी-२० क्रिकेट खेळत आहे. २५ व्या षटकापर्यंत सर्व काही ठीक सुरु होतं. त्यानंतर सर्वच खेळाडूंची बॉडी लँग्वेजमध्ये ढिलाई आल्याचे दिसले.”
पुढे तो म्हणाला, “गोलंदाजीत आम्हाला काही प्रयोग करायला हवेत. हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी तयार नाही. त्या क्षेत्रात आम्हाला काम करायची गरज आहे. कोणताही अष्टपैलू खेळाडू संघाला संतुलन देऊ शकतो. ऑस्ट्रेलियासाठी स्टॉयनिस आणि मॅक्सवेलसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. हार्दिक गोलंदाजी करु शकत नसल्यामुळे पर्याय कमी उपलबद्ध होते”.
“३७५ धावांच्या आवाहनाचा पाठलाग करताना आम्ही योजना तयार केली होती. त्यावर सर्व फलंजाजांनी काम केले नाही. आघाडीच्या तीन खेळाडूकडून मोठ्या पारीची आवशकता होती. मात्र, तसं झाले नाही. हार्दिकची खेळी सर्व भारतीयांसाठी एक उदाहरण आहे. या सामन्यात आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळलं असून संपूर्ण मालिकेत असेच सकारात्मक खेळण्याचा प्रयत्न करु”.
पहिल्याच सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये ३७४ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५० ओव्हरमध्ये ३०८ रन करता आले. यामुळे टीम इंडिया तीन मॅचच्या या सीरिजमध्ये ०-१ ने पिछाडीवर गेली आहे.
वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात; घ्या जाणून
या बैलजोडीला तोडच नाही! मालकाच्या मोबाईलची रिंग वाजली की जाग्यावर स्टॉप