IND Vs ENG : विराटलाही त्याने केलेल्या ‘त्या’ नव्या विक्रमावर विश्वास बसला नाही; पहा व्हिडीओ  

चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. हा विक्रम झाला असल्याचा स्वत: विराट कोहलीलाही विश्वास बसला नाही. हा विक्रम असा की, फिरकीगोलंदाजीवर विराट पहिल्यांदाच शून्य धावसंख्येवर बाद झाला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. तो २२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडुवर बाद झाला. इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीच्या  चेंडूवर विराटने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा अंदाज चूकला अपेक्षेपेक्षा जास्त स्वींग झालेला चेंडूने कोहलीचा त्रिफळा उडवला आहे.

https://twitter.com/Naveedk07/status/1360472741493821440?s=20

नुकताच खेळपट्टीवर उतरलेल्या विराटला पहिल्याच चेंडूवर असं काही होईल याचा विश्वासच बसला नाही. जेव्हा इंग्लंडच्या खेळाडूंनी विराटचा त्रिफळा उडालेला पाहून अनंद व्यक्त केला तेव्हा विराट अश्चर्यचकीत होऊन पाहतच राहिला. त्याला आपण कसे आऊट झालो हेच समजत नसावे. त्याने चक्क दुसऱ्या बाजूला उभा असणाऱ्या रोहित शर्माला मी आऊट झालो आहे का? असे विचारले आहे. अखेर याचा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिला.

भारतीय कर्णधार असणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर अनेक मोठे-मोठे विक्रम आहेत. हे विक्रम मोडणे अनेक क्रिकेटर्सला शक्य नाही. परंतु या कसोटी सामन्यात नकोशा विक्रमाची नामुष्की विराटवर ओढवली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.