Homeखेळविराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा; सोशल मिडीयावर भावूक पोस्ट शेअर करत...

विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा; सोशल मिडीयावर भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला…

भारतीय क्रिकेटला आज अजून एक धक्का बसला. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने शनिवारी कसोटी फॉरमॅटमध्येही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून त्यानो ही घोषणा केली.

T20 विश्वचषकापूर्वीच त्याने टी ट्वेंटी फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती, तर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले होते. रोहीत शर्माला त्यानंतर एकदिवसीय संघाचे कर्णधार करण्यात आले होते. आता विराटने कसोटी क्रिकेट फॉरमॅटमध्येही कर्णधारपद सोडले आहे. virat kohli resign test captaincy

2014 मध्ये विराट कोहलीला कसोटीचे कर्णधारपद मिळाले होते. धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. आता बीसीसीआय कुणाला कर्णधार बनवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

विराट कोहलीने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने हा धक्कादायक निर्णय घेतला. विराट कोहलीने लिहिले की, “मी माझे काम प्रामाणिकपणे केले आणि कोणतीही कसर सोडली नाही.”

ट्विटरवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत विराट कोहलीने महेंद्रसिंग धोनी आणि इतर सर्वांचे आभार मानले आहेत. कर्णधार म्हणून संधी दिल्याबद्दल त्याने बीसीसीआयचेही आभार मानले आहेत. विराट कोहलीने या पोस्टमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या आहेत.

तो म्हणाला मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी 7 वर्षे संघासाठी काम केले. कोहलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सर्व काही एका क्षणी थांबते आणि कसोटी कर्णधार म्हणून माझ्यासाठी ते आहे. हे आता होत आहे, या प्रवासात अनेक चढ-उतार आले आहेत.

प्रत्येक गोष्टीत माझे १२० टक्के देण्यावर माझा विश्वास आहे. मी तसे करू शकलो नाही तर ते संघासाठी चांगले नाही. मी माझ्या मनाने स्पष्ट आहे आणि संघाशी अप्रामाणिक असू शकत नाही.

यापुढे तो तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार असणार नाही. एक खेळाडू म्हणून तो संघाशी जोडला जाईल. कदाचित कोहली कर्णधारपद सोडेल अशी अपेक्षाही कोणी केली नसेल. त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.

विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि 40 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा नंबर लागतो. धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि 27 सामने जिंकले.