विराट कोहली देणार कर्णधारपदाचा राजीनामा? बीसीसीआयकडून मोठा खुलासा..

मुंबई । पुढील महिन्यात यूएईमध्ये होणारा टी -20 विश्वचषक जिंकण्यात भारत अपयशी ठरला तर कोहलीला मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून टाकले जाऊ शकते. त्याच्या जागी रोहित शर्माची नियुक्ती होऊ शकते, अशा बातम्या प्रसार माध्यमातून येत होत्या. यामुळे चर्चा सुरू झाली होती.

असे असताना आता विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होण्याचे वृत्त बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सोमवारी फेटाळून लावले आहे. यामुळे विराट कोहली राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत चर्चा रंगली होती.

धुमाळ म्हणाले, हे बकवास आहे आणि असे काहीही होणार नाही. याबाबत केवळ चर्चा सुरू आहे. बीसीसीआयने या विषयावर चर्चा केलेली नाही. यापूर्वी देखील असे वृत्त आले होते की, कोहली कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी यशस्वी आहे पण मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धांमध्ये अपयश आल्यामुळे रोहितला हे काम सोपवले जाऊ शकते.

विराटच्या नेतृत्वाखाली अजून टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली नाही. तसेच त्याने आयपीएल देखील जिंकली नाही. यामुळे त्याची जागा रोहित शर्माकडे द्यावी असे देखील अनेकांनी म्हटले आहे. यामुळे त्याच्यावर दबाव वाढत आहे.

यामुळे लवकरच कर्णधार बदलला जाऊ शकतो, असे अनेकांना वाटत आहे. मात्र धुमाळ यांनी याबाबत कोणहीती चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे. यामुळे आता टी-20 वर्ल्ड कपनंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून पुढील कर्णधार पदाबाबत गणित ठरणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.