Virat Kohli MS Dhoni Meet: विराट कोहली थेट एम.एस. धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडेपूर्वी रांचीत नेमकं काय झालं?, Video

Virat Kohli MS Dhoni Meet: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa ODI) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना रांची (Ranchi) येथे खेळवला जाणार असून टीम इंडियाचे सर्व खेळाडू शनिवारी रांचीत दाखल झाले. याचदरम्यान भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खास भेटीसाठी माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) निवासस्थानी पोहोचल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.

धोनीच्या घरातून बाहेर पडताना दोघेही एकाच कारमध्ये दिसले. कार एमएस धोनी स्वतः चालवत होता, तर विराट कोहली समोरच्या सीटवर बसलेला दिसला. या भेटीनंतर सोशल मीडियावर दोघांच्या मैत्रीची पुन्हा चर्चाच होऊ लागली आहे.

वनडे मालिकेची तयारी जोरात

दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघ वनडे आणि टी-20 मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. शनिवारी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली रांची येथे पोहोचले. शुभमन गिल (Shubhman Gill) दुखापतीमुळे बाहेर गेल्याने केएल राहुल (KL Rahul) वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरदरम्यान तीन सामने खेळले जातील, तर त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.

भारताचा वनडे संघ 

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.

दक्षिण अफ्रिकेचा वनडे संघ 

टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, रुबिन हर्मन, केशव महाराज, मार्को जॅनसेन, एडेन मार्कराम, लुंगी एनगिडी, रायन सुबरेन, प्रिलेटन.