‘I love you’ म्हणत विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्ससाठी केली भावनिक पोस्ट, चाहतेही झाले भाऊक

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटर आणि 360 डिग्री नावाने ओळखल्या जाणाऱ्या एबी डिव्हिलियर्स खेळाच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा झाल्यानंतर त्याचा जवळचा मित्र आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीने एक भावनिक पोस्ट केली आहे.

डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु तो आयपीएलसह जगभरातील T20 लीगमध्ये खेळत होता. फेसबुक पोस्टमध्ये स्वतःचा आणि डिव्हिलियर्सचा जुना फोटो शेअर करत कोहलीने लिहिले की, ‘तुम्ही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी सर्वस्व दिले आणि हे माझ्या मनाला चांगलच माहीत आहे.

कोहली पुढे म्हणतो की, तुम्ही या फ्रेंचाइजीसाठी अमूल्य होता. तुमच्यासाठी माझ्याकडे शब्दही नाहीत. चिन्नास्वामी स्टेडियम तुम्हाला मिस करेल. मला पण तुमची खूप आठवण येईल. भाई आता मी तुझ्याबरोबर खेळू शकणार नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमीच तू माझा नंबर 1 चाहता असाल.

कोहली का पोस्ट

कोहली आणि डिव्हिलियर्स यांच्यात मैदानापासून बाहेरपर्यंत खूप मैत्री होती. दोन्ही खेळाडूंना एकमेकांबद्दल खूप आदर होता. मात्र, या जोडीला आयपीएलमध्ये त्यांच्या संघ आरसीबीसाठी विजेतेपद मिळवून देण्यात अपयश आले. डीव्हिलियर्स सलग 11 वर्षे आरसीबीशी संबंधित होता.

आरसीबीच्या ट्विटर हँडलवरून जारी केलेल्या व्हिडिओमध्ये डिव्हिलियर्स म्हणाला, ‘मी आरसीबीसोबत बराच वेळ आणि चांगला वेळ घालवला आहे. 11 वर्षे अशीच निघून गेली आणि आता या पोरांना सोडून जाताना बरं वाटत नाही.

या निर्णयाला बराच वेळ लागला पण विचारविनिमय केल्यानंतर मी निवृत्ती घेऊन माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. मी आरसीबी व्यवस्थापन, माझा मित्र विराट कोहली, संघातील सहकारी, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, चाहते आणि संपूर्ण आरसीबी कुटुंबाचे आभार मानू इच्छितो.

डिव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 114 टेस्ट, 228 वनडे आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या डिव्हिलियर्सची गणना आजवरच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 47 शतके झळकावली आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सुनावणीदरम्यान बनियानवरच आला होता आरोपी; संतापलेल्या न्यायाधीशांनी दिली ‘ही’ भयंकर शिक्षा
‘शेतकरी अतिरेकी आहेत, तर मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले? शेवटी अहंकार पराभूत झाला’
मोदींच्या निर्णयाला चंद्रकांत पाटलांचा विरोध, म्हणाले कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.