६ वर्षांपूर्वी विराट कोहलीने पाहिलेले ‘ते’ स्वप्न आज झाले पूर्ण, सर्व भारतीयांसाठी ठरला आनंदाचा क्षण

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंग धोनी नंतर कर्णधार पदाची जबाबदारी विराट कोहलीने यशस्वीपणे संभाळली आहे. त्याच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने अनेक मॅच जिंकल्या आहेत. आता त्याने ६ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे.

आता विराटच्या नेतृत्वाखाली आयसीसी क्रमवारीत भारताने अव्वल स्थान मिळवल आहे. विराटसेनेने गेल्या ५ वर्षांपासून अव्वल स्थान कायम राखले आहे. यामुळे आता विराट कोहलीने ६ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज ते साकार झाले आहे.

यामुळे सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. यामध्ये टीम इंडिया १२१ पॉइंट्ससह पहिले स्थान कायम राखण्यात यशस्वी राहिली आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडची टीम आहे. इंग्लंडने चौथ्या क्रमांकावरुन तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. या क्रमवारीत नेहेमी काटे की टक्कर बघायला मिळाली आहे. मात्र टीम इंडियाने पहिला नंबर मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताला हे स्थान काही सहज मिळाले नाही.

भारतीय संघाला इथपर्यंत जाण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली आहे, क्रिकेटमध्ये आज भारताचा जगात बोलबाला आहे, तो एका दिवसांत झालेला नाही. त्यासाठी मोठे परिश्रम खेळाडूंनी घेतले आहेत. यामुळे आज ताकदीचे संघ भारतीय संघासोबत खेळण्यास कचरतात.

जे स्वप्न त्याने ६ वर्षांपूर्वी पाहिले होते की, कमीत कमी ५ वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये भारत जगावर राज करेल, आणि आज त्याचे स्वप्न साकार झाले आहे. यामुळे टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

विनायक माळीचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागच खर कारण आलं समोर; जाणून घ्या पुर्ण माहिती..

उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांशी साधला संवाद; कोरोना लढ्यात डॉक्टरांचे महत्व केले अधोरेखित

डोळ्यादेखत रुग्ण जीव सोडताहेत, आम्हाला काहीच करता येत नाही; फेसबूक लाईव्हमध्ये डॉक्टर ढसाढसा रडले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.