विराट कोहलीचा मराठमोळ्या लावणीवर ठेका; पहा भन्नाट व्हिडीओ

दुबई | आयपीएल २०२० मध्ये गुरूवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध किंग्स ईलेव्हन पंजाबचा सामना पार पडला. यामध्ये पंजाबने बेंगलोरला धूळ चारली. सामना होण्याच्या आधी विराट कोहलीचा एक व्हिडीओ खुप व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहुन विराटच्या चाहत्यांना हसु फुटले आहे. या व्हिडिओवर काही लोकांनी मीम्ससुद्धा बनवल्या आहेत. या व्हिडिओमध्ये विराट कोहली सराव करत असताना मध्येच मैदानावर झोपून डान्स करायला सुरूवात करतो.

विराट कोहलीचे असे बरेच व्हिडिओ याआधीही व्हायरल झाले आहेत. पण या व्हिडिओमध्ये काही चाहत्यांनी वेगवेगळी गाणी टाकली आहेत. काहींनी तर मला जाऊ द्या ना घरी हे गाणे टाकून व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडीयावर विराटच्या डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

एव़ढेच नाही तर न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यानेही या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने विराटचा डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर करत लिहीले आहे की, जेव्हा ती तुम्हाला सांगते जा आणि दरवाजा बंद कर.

दरम्यान, गुरूवारी झालेला सामना बॅंगलोरने गमावला. विराटने या सामन्यात ३९ चेंडूत ४८ धावा केल्या. बेंगलोरने या सामन्यात १७१ धावा केल्या होत्या. पंजाबने २० शटकांत १७७ धावा करत बेंगलोरला पराभूत केले. या सामन्यात लोकेश राहुलने ६१ धावा केल्या आणि ख्रिस गेलने ४५ धावा केल्या होत्या.

महत्वात्या बातम्या
एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्यानं अख्ख पोलीस स्टेशन सस्पेंड केलं होतं; वाचा पुर्ण किस्सा
तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे
सचिनची मुलगी सारा तेंडूलकर शुभमन गिलची पत्नी? पहा कसं काय घडलं हे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.