मुंबई | टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी वर्षाची सुरूवात अत्यंत आनंदाने झाली आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली.
त्यानंतर आता विराट-अनुष्काच्या मुलीचा पहिला फोटो समोर आला आहे. विराटचा भाऊ, विकास कोहली याने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या नव्या पाहुनीचा पहिला फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
विकासने विराट अनुष्काच्या मुलीच्या इवल्याश्या पायांचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. आम्हाला खूप आनंद झाला असून आमच्या घरी एक परी आलीय, अशी कॅप्शन विकासने या फोटोला दिली आहे. फोटोवर वेलकम असा मजकूरही लिहिलेला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनुष्का गरोदरपणातही योगा आणि वर्कआउट करताना दिसून येत होती. अनुष्का सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन तिच्या गरोदरपणाचा प्रवास तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत होती. यादरम्यान अनुष्काने प्रसिद्ध वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होते. ते फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचे सांगितले होते. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
…तोपर्यंत कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होत राहणार; WHO तज्ज्ञांनी दिला इशारा
शेतकरी आंदोलन! …म्हणून सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला झापलं; राजू शेट्टी बरसले
किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला ‘हा’ गंभीर आरोप; थेट निवडणूक आयोगाकडे केली तक्रार