‘या’ खेळाडूमुळे विराटचं BCCI सोबत वाजलं, सोडाव लागलं कर्णधारपदावर पाणी; वाचा आतली खबर..

गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपण कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. विराटच्या या घोषणेने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. तर विराटच्या चाहत्यांना या निर्णयाचा धक्काही बसला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली कर्णधार पद सोडणार असल्याची चर्चा होती. विराट कोहलीने कामाच्या विभागणीचं व्यवस्थापन करण्याचं सांगत टी-२० विश्वचषकानंतर कर्णधार पद सोडणार असल्याचे सांगितले आहे

पण जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यानंतरच त्याच्या फलंदाजीवर झालेला परिणाम आणि सुमार कामगिरीच्या पार्श्वभुमीवर तो टी-२० चे कर्णधारपद सोडेल, असे म्हटले जात होते. आता १७ ऑक्टोबर १४ नोव्हेंबर पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर कोहली हे पद सोडणार होता.

मिळालेल्या माहितीनुसार, निवड समितीमधील नवीन सदस्य आणि प्रशिक्षणासंदर्भातील बदलांमुळे विराट कोहलीसमोर असणारी आव्हाने वाढत चालली होती. यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेल्या इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिकेत विराटला शिखर धवन हवा होता. पण बीसीसीआयचे मत वेगळे होते.

धवनला संघात घेण्यावरुन विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये वाद झाला होता. धवनऐवजी विजय हजारे चषकामध्ये चांगली कामगिरी करणऱ्या खेळाडूला संघात संधी देण्याचा निवडकर्त्यांचा विचार होता. पण विराटला शिखर धवनच सलामीवीर म्हणून हवा होता.

या वादावरुन शेवटी निवडकर्त्यांना विराटच्या बाजून झुकतं माफ दिलं. त्यानंतरही श्रीलंका दौऱ्यावर कर्णधार म्हणून शिखर धवनला पाठवण्यात आले. मार्च महिन्यातही निवड समितीने निर्णय घेतलेला नव्हता. त्यावेळी निवड समितीने पाच दिवसांचा वेळ घेतला होता. हा वाद वगळता दुसरा कोणताही वाद विराट आणि निवड समितीमध्ये झालेला नाही.

विराटने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांच्याशी चर्चा केली होती, त्यावेळी विराटने आपला निर्णय बीसीसीआय कळवला आहे. विश्वचषकाधीच त्याने आपले निर्णय सांगितला असल्यामुळे आता बीसीसीआयलाही वेळ मिळेल असे विराट कोहलीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

ठरलं! अजित पवार भाजपला पाडणार भलेमोठे खिंडार; स्वत:च केली घोषणा
बाजारात आलाय फक्त छोट्याश्या डब्बीमध्ये मावनारा भलामोठा गाडीचा कव्हर; जाणून घ्या..
रिविलिंग ड्रेस घातल्यामुळे नोरा फतेही झाली ओप्स मुव्हमेंटची शिकार, सर्वांसमोरच ड्रेस करावा लागला नीट; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.