शार्दूलला सामनावीर तर भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार का नाही दिला? विराट भडकला

पुण्यात नुकताच शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडच्या तोंडातील घास हिसकावून घेत सामना जिंकला. अवघ्या ७ धावांनी इंग्लंड पराभूत झाले. टीम इंडियाने ही मालिकाही २-१ ने आपल्या नावावर केली.

मात्र सामना जिंकलेला असताना विराट कोहलीला पंचांचा एक निर्णय आवडला नाही. भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सिरीज आणि शार्दूल ठाकुरला मॅन ऑफ द मॅच न मिळाल्याने विराट संतापला. मॅन ऑफ द मॅच सॅम करनला देण्यात आले.

त्याने ९५ धावा करत इंग्लंडला विजयाच्या जवळ नेले होते. तसेच जॉनी बेअरस्टोलाही मॅन ऑफ द सिरीजने गौरविण्यात आले कारण त्याने पहिल्या सामन्यात ९४ धावा, दुसऱ्या सामन्यात १२४ धावा केल्या होत्या. मात्र हा निर्णय विराट कोहलीला आवडला नाही.

याबद्दल त्याने सामना संपल्यानंतर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, भुविला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार का मिळाला नाही हे मला समजत नाही. अशा खेळपट्टीवर कमी धावा देत सहा विकेट्स घेणे मॅन ऑफ द सिरीजप्रमाणे आहे.

तसेच शार्दूलने ३० धावाही केल्या आणि ४ बळीही घेतले तरीही तो मॅन ऑफ द मॅच ठरला नाही. हे पूर्णपणे समजण्यापलीकडे आहे, असा संताप विराटने व्यक्त केला आहे. दरम्यान, भारताने शेवटच्या सामन्यात इंग्लंडसमोर ३३० धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण इंग्लंडला या धावांचा पाठलाग करताना ५० षटकांत ९ बळी गमावून ३२२ धावाच करता आल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.