रोहित शर्माबाबत स्पष्टच बोलला विराट; ‘या’ मुद्दयावर व्यक्त केली नाराजी..

सिडनी | हिटमॅन रोहीत शर्माच्या भारतीय संघाच्या स्थानावरून खूप वाद सुरू आहे. त्याला संघात स्थान का नाही देण्यात आलं यावरून सोशल मीडियावर सध्या नेटकरी बीसीसीआयवर संतापले होते. पण नंतर बीसीसीआयने संघात काही बदल करत रोहितला कसोटी संघात स्थान दिलं.

पण नंतर रोहितने NCA मध्ये फिटनेसवर काम करणे पसंत केले. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला हार पत्करावी लागली. रोहित शर्मा जर संघात असता तर चित्र वेगळे असते असे काहींचे मत आहे.

पहिल्या वन-डे सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीने रोहितच्या दुखापतीबद्दल असलेल्या अनिश्चीत वातावरणावर आपले मौन सोडले आहे. दुबईत निवड समितीची बैठक होण्याआधी आम्हाला दोन दिवस इ-मेल आला होता.

या मेलमध्ये लिहिले होते की, रोहित दुखापतीमुळे खेळू शकणार नाही असं नमूद केलं होतं, असं विराट म्हणाला आहे. रोहितला बरे होण्यासाठी फोन आठवड्यांचा कालावधी लागेल असं आम्हाला समजले होते.

त्याला झालेल्या दुखापतीबद्दल आणि संघनिवडीबद्दल सर्व गोष्टींची कल्पना त्याला आधीच देण्यात आली होती. रोहितला हे सर्व माहीत होतं. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नसेल हे आम्हाला समजले व संघाची घोषणा झाली आणि त्यानंतर रोहित लगेचच सरावासाठी उतरला.

त्याने आयपीएलमध्ये काही शेवटचे सामनेही खेळले हे पाहून आम्हाला वाटले होते की तो आमच्यासोबत येईल पण असे झाले नाही. तो आमच्यासोबत का आला नाही? याचे कारण अद्याप मला समजू शकले नाही, असे विराट कोहली म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

अशी शक्कल लढवून लग्नाच्या रात्रीच वधू प्रियकरासोबत झाली फरार…

खतरनाक! सुपरमार्केटमध्ये महिलेने फोडल्या ५०० दारूच्या बाटल्या, पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.