तुम्हाला कधीच कोणी विसरु शकणार नाही; मिल्खा सिंग यांच्या आठवणीत विराट कोहली झाला भावूक

प्रसिद्ध धावपटू आणि प्लाईंग सिख म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते, पण उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे.

मिल्खा सिंग यांच्या अशा अचानक जाण्याने पुर्ण क्रिडाजगतवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे विराट कोहलीसोबतच गांगुली, पीटी उषा अशा अनेक खेळाडूंनी मिल्खा सिंग यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे.

विराट कोहलीने एक ट्विट करत मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्यामुळे पुर्ण देशाला ध्येय गाठण्यासाठी एक वेगळी प्रेरणा मिळाली आहे. त्यांनी कधी पराभव स्विकारायचा नाही आणि स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी लढत राहिले पाहिजे हे पुर्ण राष्ट्राला शिकवले आहे. तुम्हाला कधी कोणी विसरणार नाही, असे ट्विट विराटने केले आहे.

तसेच सौरव गांगुलीनेही मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या बातमीमुळे मी खुप दु:खी आहे. मिल्खा सिंग भारतातील महान खेळाडूंपैकी एक आहे. त्यांनी भारतातील तरुणांना एक खेळाडू बनण्यासाठी प्रेरणा दिली आहे, असे ट्विट सौरव गांगुलीने केले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या निधनाने आज भारतीयांच्या हृदयातील एक जागा रिक्त राहिल. परंतु आपण येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहाल, असे सचिनने म्हटले आहे.

पीटी उषा यांनी मिल्खा सिंग यांना एक ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. माझे आदर्श आणि माझे प्रेरणास्थान मिल्खा सिंग यांचे निधनाने खुप वाईट वाटले. त्यांच्या दृढ संकल्पनांनी आणि मेहतीने त्यांनी लाखो लोकांना प्रेरीत केले आहे, असे पीटी उषा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सुरुवातीला लोक म्हणायचे, शिवसेना ५-६ महिन्यांत बंद पडेल पण आज…”
शिवसेनेच्या वर्धापनदिनी भन्नाट ऑफर; भाजपचे ओळखपत्र दाखवा अन् पेट्रोल मोफत मिळवा
मोठी बातमी! तीन न्यूज चॅनेल्सना दंड, माफी मागण्याचे निर्देश, तबलिगी प्रकरण आले अंगटल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.