आयपीएलनंतर विराट उतरला कोरोना लढ्यात; दोन कोटी दान करत लोकांना केले ‘हे’ आवाहन

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आगे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णांमुळे ऑक्सिजन, बेड्स, औषधांचा तुडवडा निर्माण होत आहे.

त्यामुळे कोरोनाच्या या संकटात अनेक सेलिब्रीटी लोकांच्या मदतीला धावून येत आहे. आता कोरोनाच्या या परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मदतीसाठी पुढे आले आहे.

विराट आणि अनुष्काने मिळून कोरोनाच्या संकटात लढण्यासाठी दोन कोटी रुपये दान केले आहे. त्यांचे लक्ष सात कोटी रुपये जमा करण्याचे आहे. ही निधी ते केटो या अभियानाअंतर्गत जमा करणार आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी केटो हे अभियान सुरु केले आहे. या अभियानाला सात दिवसांसाठी चालवण्यात येणार आहे. जमा झालेला निधी एसीटी ग्रांट्स नावाच्या संस्थेला दान करण्यात येणार आहे. ही संस्था ऑक्सिजन आणि उपचारासंबंधित सर्व सुविधांच्या क्षेत्रात काम करत आहे.

विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट आणि अनुष्का केटो अभियानाअंर्गत सांगताना दिसून येत आहे. तसेच त्यांनी या अभियानासाठी दोन कोटी रुपये दान केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आपला देश कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. आता सर्वांनी एकजूट होऊन जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत कशी पोहचेल त्यासाठी काम करत आहे. आपण लवकरच या संकटाला हरवू असे विराटने आणि अनुष्काने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतावर जडला ब्रिटिश खेळाडूचा जीव; भारतबद्दल बोलला असं काही की तुम्हालाही अभिमान वाटेल
खरच शोभलीस छत्रपतींची लेक; राणूआक्काने बाकीच्यांसारखी बडबड न करता केले ‘हे’ काम; वाचून अभिमान वाटेल
आयपीएल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आयपीएलचे उर्वरीत सामने या देशात होण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.