धडाकेबाज खेळी करणाऱ्या इशान किशनचे विराटने केले कौतुक, म्हणाला…

अहमदाबाद | भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. यामधील दुसरा टी-२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. यामध्ये भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे.

या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारताकडून इशान किशन या युवा फलंदाजाने ३२ चेंडुमध्ये ५६ धावांची तुफानी खेळी केली.

पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात इशानने तुफान खेळी केल्याने तमाम क्रिकेटप्रेमींचे त्याने मन जिंकले आहे. संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही युवा फलंदाज इशानचे कौतूक केले आहे.

विराट कोहली म्हणाला, “टी20 मध्ये इशानने पहिल्याच सामन्यात आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा चांगलाच धूव्वा उडवला. इशान ज्या पध्दतीने खेळत होता. त्यावरून त्याची सामन्यावरील पकड दिसून येत होती.”

“इशान एक निर्भय खेळाडू आहे. खेळताना त्याने खेळ समजून घेतला. इशानसारख्या मोठ्या खेळाडूमध्ये मला खुप गोष्टी दिसल्या. इशान आज उत्तमपणे खेळला आहे.” असं कर्णधार विराट कोहली म्हणाला.

दरम्यान सामन्यात इशान किशन आणि विराट दोघांच्या जोडीने धडाकेबाज खेळी करत ९४ धावांची भागीदारी केली. यामध्ये इशानने ४  षटकार आणि ५ चौकार ठोकले. इशानने दमदार खेळी करून शिखर धवन समोर आव्हान उभे केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारताने वचपा काढला, इंग्लंडचा दारूण पराभव; इशान, विराटची धुंवादार खेळी
इशान किशनने पदार्पणातच इंग्लीश बॉलर्सच्या उडवल्या चिंधड्या; ३२ चेंडूत ५६ धावांची तुफानी खेळी
…तोपर्यंत स्टेडियममध्ये मॅच बघायला जाणार नाही; इशान किशनच्या आईने केल्या भावना व्यक्त
अभिनेते जॅकी श्रॉफला घरकाम करणाऱ्या तरूणीच्या आजीचं निधन झाल्याचं समजलं अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.