“महत्वाच्या गोलंदाजाला दोन षटके देऊन थांबवत असाल तर विराटची कॅप्टन्सी न समजणारीच आहे”

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. यामुळे आता विराट कोहलीवर टीका होऊ लागली आहे. माजी खेळाडू गौतम गंभीरने जोरदार टीका केली आहे.

गौतम गंभीरने विराटच्या कर्णधारपदाच्या शैलीवर टीका केली, मला विराटची कॅप्टन्सी खरंच समजत नाही. ऑस्ट्रेलियासारख्या संघावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट मिळवणे गरजेचे आहे याबद्दल आपण नेहमी बोलत असतो.

यावेळी तुम्ही तुमच्या महत्वाच्या गोलंदाजाला फक्त दोन षटकं देता?? सर्वसाधारणपणे वन-डे क्रिकेमध्ये जलदगती गोलंदाज ४-३-३ च्या हिशोबाने स्पेल टाकतात. पण तुम्ही जर संघातल्या महत्वाच्या गोलंदाजाला केवळ दोन षटके देऊन थांबवणार असाल तर खरेच विराटची कॅप्टन्सी न समजणारीच आहे.

गौतम गंभीर म्हणाला, हे टी-२० क्रिकेट नाही. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघावर ५१ धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीच्या मैदानावर ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. मात्र भारताचा पराभव झाला. टीममध्ये सध्या कुजबूज सुरू असून रोहित शर्माला टीममध्ये घेण्यात आले नाही. यामुळे कोहलीवर टीका होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.