कोहलीची ‘विराट’ कामगिरी, मोडला सचिनचा ‘हा’ मोठा विक्रम

कॅनबेरामध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेमध्ये विराट कोहलीसमोर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडण्याची संधी होती. आता कोहलीने त्या संधीचे सोने करत सचिनचा विक्रम मोडला आहे. सगळ्यात जलद 12 हजार रन करण्याचा विक्रम विराटने केला आहे.

याआधी हे रेकॉर्ड मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होते. तिसऱ्या वनडेमध्ये विराटला १२ हजार रन पूर्ण करायला २३ रनची गरज होती, त्यामुळे या रन पूर्ण करताच विराटने इतिहास घडवला. विराट कोहलीने केवळ २४२ इनिंगमध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

हा विक्रम आधी सचिनच्या नावे होता. सचिनने ३०० इनिंगमध्ये १२ हजार धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीने आपला पहिला एकदिवसीय सामना ऑगस्ट २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. या मालिकेतील दुसरा सामना खेळत असताना त्याने २५० सामने खेळण्याचा विक्रम केला. २५० एकदिवसीय सामने खेळणारा विराट आठवा भारतीय खेळाडू ठरला

तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत ४१८ सामन्यांमध्ये ७० शतकांसह २२,०११ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर (३४, ३५७), कुमार संगकारा (२८,०१६), रिकी पॉन्टिंग (२७,४८३), माहेला जयवर्धने (२५९५७), जॅक कॅलिस (२५,५३४), राहुल द्रविड (२४,२०८) आणि ब्रायन लारा (२२,३५८) कोहलीपेक्षा पुढे आहेत.

संजय राऊत आज लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार दाखल, कारण…

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आदित्य नारायणने केले लग्न; फोटो झाले व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.