विराट-अनुष्काच्या लेकीला बॉलीवूड कलाकारांनी दिले महागडे गिफ्ट, वाचून डोळे फिरतील

मुंबई | काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट-अनुष्काच्या लेकीचं नाव काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अलीकडेच विराट- अनुष्काने आपल्या लाडक्या लेकीचे नावही घोषित केले आहे.

विराट- अनुष्काच्या घरात एका चिमुकलीने आगमन केल्यामुळे ती देवीचं रुप आहे असं म्हणत त्यांनी या चिमुकलीचं नाव वामिका ठेवले आहे. ‘वामिका’ या नावाचा अर्थ ‘दुर्गा’ असा आहे. वामिका हे दुर्गा देवीचं आणखी एक नाव आहे.

तसेच विराट- अनुष्काच्या लाडक्या लेकीला शाहरूख-सलमान, कतरीना, दीपिका यांच्यासह बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री मधील सुपरस्टार्सनी काही गिफ्टसही पाठवलेली आहे. या गिफ्टची किंमत ऐकून तुमचेही डोळे पांढरे पडतील. बॉलीवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने देखील वामिकाला सोन्याचे पायातील पैंजणचाळ भेट दिले आहेत. ज्याची किंमत लाखाच्यावर आहे.

तसेच अनुष्काची मैत्रीण ऐश्वर्या राय बच्चनने वामिकासाठी नाही पण तिच्या मॉम डॅडसाठी खूप महागाचे असे हँडमेड चॉकलेट्स पाठवल्याची माहिती मिळत आहे. तर रणवीर सिंग व दीपिका पादुकोणने वामिकाला सोन्याची चेन गिफ्ट म्हणून दिल्याचे कळते आहे.याची किंमत सुमारे एक लाख ऐंशी हजार रूपये असल्याचे समजते आहे.

दरम्यान, बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान व त्याची गौरी खान यांनी वामिकाला एक खास भेट दिली आहे. शाहरूख व गौरीने वामिकासाठी एक डायमंडजडीत ब्रेसलेट पाठवले आहे. ज्याची किंमत दीड लाख असल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
काठी टेकत राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला आलेले हे आजोबा नक्की कोण?
‘अख्ख्या पृथ्वीवर माझ्यासारखी दुसरी अभिनेत्री कोणच नाही, म्हणून मी एवढी अहंकारी आहे’
कंगनाला उपरती! खारमधील राहत्या फ्लॅटबाबत कंगनाकडून याचिका मागे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.