‘विरुष्का’च्या लेकीचं झालं बारसं; नाव वाचून आश्चर्य वाटेल…

मुंबई | टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी वर्षाची सुरूवात अत्यंत आनंदाने झाली आहे. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट-अनुष्काच्या लेकीचं नाव काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती.

अखेर आता सोमवारी अनुष्काने लेकीसोबतचा फोटो पोस्ट करून तिचे नाव जाहीर केले. विराट-अनुष्काप्रमाणे या जोडप्याच्या मुलीचे नावही खूप खास आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे. वामिकाचे नाव विराट आणि अनुष्काचे नाव एकत्र करून बनवले आहे.

लेकीचा सोशल मीडियावरील पहिलाच फोटो असल्याने अनुष्काने खास कॅप्शनही लिहिली. ‘आम्ही एकत्र प्रेम व कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकानं आमच्या आनंदात आणखी भर टाकली. रडणं, हसणं, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेलं प्रेम व प्रार्थना यासाठी आभारी आहे,’ असे तिने म्हंटले आहे.

विराटने अशी दिली होती आनंदाची बातमी..
कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती. विराटने ट्विटमध्ये म्हंटले होते की,”तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की, आमच्या घरी कन्यारत्न आली. तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो.

अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट,” असे ट्विट विराटने केले होते.

महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! कोरोना लसीकरणासाठी अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले..
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; बजेटच्या दिवशीच बदलणार ‘या’ गोष्टी…
कोरोनाकाळात पाच महीने घरी बसूनही तुम्हाला पगार दिला, आता जरा दुसऱ्यांच्या वेदनांचा विचार करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.