..आणि पोलिसांनी शटर उघडून दुकान चालवणाऱ्या मुलाला लावल्या कानशिलात, पहा व्हिडीओ

पुर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. रूग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध आणि लॉकडाऊन लावण्यात आले आहे. तरीही काही लोक या नियमांचे उल्लघंन करत आहेत. त्यांना सांगूनही ते नियमांचे पालन करताना दिसत नाहीयेत.

तसेच कोरोनाच्या काळात मर्यादित लोकांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी लग्नसमारंभ पार पडत आहेत. अनेक ठिकाणी लग्नाचा बस्ता घेताना लोक दिसत आहेत आणि ते ही लपून छपून.

सध्या असाच काही एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मध्य-प्रदेशमधील दतिया भागातील आहे. या भागात दुकानाचे शटर लावून गुपचूप लग्नाची खरेदी सुरू होती. येथील पोलिस याचा शोध घेत होते.

त्यावेळी जसे पोलिसांना शटर उघडले एक तरूण आणि अनेक बायका त्या दुकानातून आरडाओरडा करत बाहेर पळायला लागल्या. लॉकडाऊनमध्ये दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली नसताना बेकायदेशीरपणे हा प्रकार चालू होता.

त्यामुळे पोलिसांनी दुकान चालवणाऱ्या मुलाला चांगलाच चोप दिला आहे. तो पोलिसांची माफी मागत होता मात्र पोलिसांनी त्याचे काहीच ऐकून घेतले नाही. त्याला कॉलरला पकडून तेथून घेऊन गेले. दरम्यान, देशात दररोज कोरोना रूग्णांची संख्या उचांकी गाठत आहे.

सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांहून जास्त कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ४,०१,०७८ रूग्णांची नोंद झाली आहे. यागोदर म्हणजे पाच मे रोजी ४ लाख १२ हजार रूग्णांची नोंद झाली होती.

तसेच ६ मे रोजी ४ लाख १४ हजार कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली होती. सध्या कोरोनाबाधितांची आणि मृतांची आकडेवारी वाढतच चालली आहे. पण कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांचीही संख्या जास्त आहे ही दिलासादायक बातमी आहे.

महत्वाच्या बातम्या
२०१५ पासून चीनी संशोधक बनवत होते कोरोना व्हायरस, लीक कागदपत्रांमधून अनेक धक्कादायक खुलासे
मोदींच्या आणि इतर नेत्यांच्या रॅलींमुळे भारतात कोरोनाचा उद्रेक; who च्या टाॅपच्या शास्रज्ञांची माहिती उघड
‘अण्णा नाईक’ यांच्या खऱ्या पत्नीला पाहिलेत का? पहा फोटो
लॉकडाऊनमध्ये गुपचूप सुरू होती लग्नाची खरेदी, दुकानाचे शटर उघडून पोलिसांनी बडवलं, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.