धक्कादायक! नर्स म्हणाली तुम्ही काही दिवसांच्या सोबती, दुसऱ्याच दिवशी रूग्णाचा मृत्यु; पाहा व्हिडीओ

कोरोनाकाळात सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातल्या त्यात कोरोना वार्डातील आणि हॉस्पिटलमधील व्हिडीओ जास्त व्हायरल होत आहेत. असाच एक मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील एका रूग्णालयातील व्हिडीओ सध्या खुप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओने सगळ्यांना धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये एक नर्स कोरोनाबाधित रूग्णाला इंजेक्शन देताना दिसत आहे. इंजेक्शन देताना नर्स त्यांना म्हणते की आता तुम्ही काही दिवसांचे सोबती आहात. नर्स अतिशय व्यवस्थितपणे कोरोना रूग्णाशी संवाद साधत होती.

मात्र हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यु झाला. त्यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आता या घटनेनंतर त्या मृत्यु झालेल्या रूग्णाच्या कुटुंबियांनी नर्स आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर वंदना अग्रवाल यांना बिर्ला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. उपचारात निष्काळजीपणा केल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे.

त्यांनी रूग्णालयात खुप गोंधळ घातला. त्यांच्या मुलीचे म्हणणे आहे की, रूग्णालयात काम करत असलेल्या चंद्रा बघेल यांनी माझ्या आईला शुक्रवारी इंजेक्शन दिले. त्यावेळी त्यांनी आईला इंजेक्शन देताना त्यांना सांगितले की तुम्ही आता काही दिवसांच्या साथीदार आहात.

हा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे, असा आरोप त्यांच्या मुलीने केला आहे. शुक्रवारी आईला इंजेक्शन देण्यात आले आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आईची प्राणज्योत मालवली. दुपारी तिने अखेरचा श्वास घेतला होता, असंही त्यांची मुलगी म्हणाली आहे.

त्यांच्या उपचारासाठी जवळपास ५ लाख रूपये खर्च झाला होता. ही घटना घडल्यानंतर माजी आमदार मुन्नालाल गोयल आणि जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह रूग्णालयात दाखल झाले होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
अनघाच्या साखरपुड्यात ईशा, यश आणि गौरीची धमाल मस्ती; पहा फोटो
‘या’ कारणामूळे गोविंदाने त्यांच्या लग्नाची बातमी लोकांपासून लपवली होती; एवढ्या वर्षांनी कारण आले समोर
‘..जा तुमची स्वप्न पुर्ण करा’, भावाच्या निधनावरून ट्रोल करणाऱ्यांना निक्की तंबोलीने फटकारले
एका परदेशी अभिनेत्रीला केवळ ‘या’ गाण्यामुळे भारतीयांनी डोक्यावर घेतले होते; रातोरात झाली होती फेमस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.