जुहूमध्ये मास्क न घातलेल्या नागरिकांमध्ये आणि क्लीनअप मार्शलमध्ये जोरदार हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

कोरोनाकाळात नागरीकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. याचदरम्यान कोरोनाकाळात अनेक अशा व्हिडीओ व्हायरल झाल्या होत्या ज्यामध्ये अनेक नागरीक त्रस्त झाले होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही व्हिडीओ जुहू परिसरातील आहे.

या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की क्लीनअप मार्शल आणि नागरीकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. मास्क न लावता फिरणाऱ्या लोकांकडून क्लीनअप मार्शल दंड वसूली करत होते त्यादरम्यान ही हाणामारी झालेली दिसत आहे.

या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुहू परिसरात काही नागरिक तोंडाला मास्क न लावता फिरत होते. ते कोरोना नियमांचे पालन करत नव्हते. यावेळी क्लीनअप मार्शलही तिथेच होते.

त्यांनी मास्क न लावलेल्या नागरिकांना पाहिले आणि त्यांना अडवले. मास्क न लावलेल्या नागरिकांना अडवल्यानंतर क्लीनअप मार्शल यांनी त्यांना दंड भरण्यास सांगितले. यावेळी नागरिकांमध्ये आणि त्या क्लीनअप मार्शल यांच्यामध्ये जोरदार वाद झाला.

त्या वादाचे रूपांतर नंतर भांडणात झाले. नागरिक आणि क्लीनअप मार्शल यांच्यामध्ये नंतर जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांच्या या व्हिडीओवर खुप वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी क्लीनअप मार्शलवर टीका केली आहे तर अनेकांनी क्लीनअप मार्शलची बाजू घेत त्या नागरिकांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या
‘या’ अभिनेत्याच्या घरी गणेश चतुर्थी दिवशी झालं चिमुकलीच आगमन; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
जेव्हा सत्तरीच्या आजीने धरला ठेका तेव्हा सर्वच झाले चकित, ‘वल्लव रे नखवा’ गाण्यावर लावले ठुमके; पहाच एकदा..
बॉलीवूडमध्ये धडाकेबाज कामगीरी केलेली ही अभिनेत्री वळली अध्यात्माकडे; हे आहे त्यामागचं कारण
अमेरिकेतील एका शिकाऱ्याने १३ फूट लांब मगरीची केली शिकार; मगरीचे पोट कापल्यानंतर जे मिळाले पाहून झाला हैराण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.