उसाच्या फडातला ‘तो’ डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर होतोय व्हायरल; माधुरीकडून वाहवा

मुंबई | सोशल मिडिया हे दैनंदिन जीवनाचा घटक बनलेला आहे. यावर अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ, फोटो आपल्याला आवडतात. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या व्हिडिओमध्ये एक मुलगी डान्स करताना दिसतं आहे. ती मुलगी मदर इंडियाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत असून तिच्या अवती भोवती काही महिला दिसत असून त्या तिच्याकडे कौतूकाने पाहत आहेत. उसाच्या शेतात मुलीचा डान्स पाहून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

याचबरोबर ज्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘डान्स करण्यासाठी कुठल्या पंखांची गरज नाही. मनात हवी इच्छाशक्ती. जेव्हा हा व्हिडिओ आपण पाहतो तेव्हा त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.’

तसेच या मुलीचा डान्स पाहून बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरीनं तिचं कौतूक केले आहे. या मुलीचं कौतूक करताना माधुरी दीक्षितनं लिहिले आहे की, ‘एकदम सुंदर, अप्रतिम डान्स केला आहे. त्या मुलीनं खूप सुंदरतेनं डान्स केला आहे. तिच्यात खूप टँलेट आहे. ज्याला आता बाहेर काढण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या
VIDEO: कोरोना नियम धाब्यावर; पीपीई कीट घालून रुग्णवाहिका चालकानेच केला वरातीत डान्स
धर्मेंद्रने अमिताभ बच्चनबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाले शोलेच्या शुटींग वेळी तर
माझ्यापुढे तुझी औकात काय म्हणत नर्सने पोलीसांसमोर डाॅक्टरच्या कानाखाली वाजवल्या; पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.