…अन् नेटकऱ्यांनी सारा इतिहास मोदीमय केला, पाहा व्हायरल झालेले भन्नाट मिम्स; LieLikeModi, #BalNarendra

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेश दौऱ्याच्या पहिल्या दिवशी केलेल्या भाषणामधील एका वाक्यावरुन भारतीय सोशल मीडिया चांगलच ढवळून निघालं आहे. १९७१ साली बांगलादेशच्या स्वांतत्र्यासाठी मी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आणि मला अटकही झाली होती असे मोदी म्हणाले.

मोदींच्या याच वक्तव्यावरुन मोदी समर्थक आणि विरोधक आमने सामने आलेत. मोदींच्या या वक्तव्यावरुन अनेक मिम्सही तयार केले जात आहे. #LieLikeModi आणि #BalNarendra हे दोन हॅशटॅग वापरुन अनेकजण ट्विट करताना दिसत आहेत.

“मोदीजी हे आतापर्यंत भारताला लाभलेले सर्वोत्तम जागतिक नेते – नरेंद्र मोदी”
सॅण्डअप कॉमेडी सादर करणाऱ्या कुणाल कामरानेही उडी घेत मोदींना लक्ष करणारं एक खोचक ट्विट केलं आहे. मोदीजी हे भारताला लाभलेलं सर्वोत्तम जागतिक नेते आहेत असं नरेंद्र मोदी म्हणालेत, अशा अर्थाचे ट्विट कुणाल कामराने केले आहे.

दरम्यान, मोदी विरोधकांनी पंतप्रधानांनी बांगलादेशमध्ये केलेला सत्याग्रह आंदोलनाचा दावा खोटा असल्याचे सांगत मोदींवर उपहासात्मक पद्धतीने टीका सुरु केली आहे. अगदी अमेरिकाचा शोध लागण्यापासून ते पहिलं, दुसरं महायुद्धामध्येही मोदींचा सहभाग असल्याचे ट्विट आणि मिम्स व्हायरल केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

आत्महत्या करण्याआधी दीपाली चव्हाण यांचं भावनिक पतीला पत्र; वाचून डोळ्यांत पाणी येईल

शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडलं म्हणून आमदारांनी महावितरण अभियंत्यांना खुर्चीला बांधलं…

मोदींनी खरंच घेतला होता बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग? समोर आला ‘हा’ महत्वाचा पुरावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.