दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरुच; राहुल गांधींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

मुंबई | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले आहे. ट्विट करुन त्यांनी म्हटले की, “हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचे होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.”

शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद…
शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतल्यानंतर आता मोदी सरकारकडून काही पावले उचलण्यात आली आहेत. आता दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळापूर्वीच स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.

गृहमंत्रालयाच्या या आदेशानुसार सिंघु, टिकरी आणि मुकरबा, नांगलोई, नकुरबा चौक या तणावग्रस्त भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीत या निर्णयाचे कसे पडसाद उमटणार हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आधार कार्ड अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक, खोट्या वेबसाईटपासून राहा सावध अन्यथा…
गृहिणींसाठी कामाची बातमी! धान्याला किड लागू नये यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय  
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ! निवृत्तीचे वय ३० वर्षे की वयाची ५० वर्षे निर्णयासाठी समिती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.