Tanaji Sawant : शिंदे गटाचे नेते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. सत्तांतर झाल्यानंतर मराठा लोकांना आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका केल्या जात आहेत.
यातच मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सावंतांना इशारा दिला आहे. विनोद पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तानाजी सावंत यांना समज देण्याची विनंती केली आहे. तसेच या प्रकरणावरून त्यांनी सावंतांवर टीकाही केली आहे.
विनोद पाटील म्हणाले की, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक आगळंवेगळं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा मी निषेध करतो. मागच्या सरकारमध्ये जेव्हा तुम्हाला मंत्री व्हायचं होतं, त्यावेळेस हेच मराठा तरुण कार्यकर्ते तुमच्यासाठी शिष्टमंडळ घेऊन जात होते हे आपण विसरलात का? तसेच कोणाच्या ताकदीवर, कोणत्या गैरसमजामध्ये आपण हे वक्तव्य केलं आहे?, असा सवाल विनोद पाटील यांनी सावंतांना केला आहे.
तसेच आपले वक्तव्य अतिशय खालच्या दर्जाचे आहे, असेही ते म्हणाले. मराठा समाजातील ५० पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान देऊन हा मराठा क्रांती मोर्चा उभा केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच सरकार कोणाचं आहे कोणाचं नाही याचा आमचा संबंध नाही. राज्यात कोणाचंही सरकार आलं, तरी मराठा तरुणांची मागणी ही आरक्षणाचीच होती, आरक्षणाचीच आहे आणि आरक्षण मिळेपर्यंत हीच मागणी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात. एक जबाबदार व्यक्ती आहात. तुमच्या अशा वागण्यामुळे मराठा समाजदेखील बदनाम होत आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्र्यांना विनंती करतो आपण यांना तात्काळ समज द्यावी. अन्यथा, याचे परिणाम गंभीर होतील याची काळजी राज्य सरकारने घ्यावी, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर तानाजी सावंत यांनी माफीही मागितली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आश्वासनही तानाजी सावंत यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
..तर मी राजीनामा देऊन टाकेन; तानाजी सावंत यांनी केलं जाहीर आव्हान, वाचा नेमकं काय म्हंटलंय?
त्यांना हाफकिन पण दलाल वाटला..; तानाजी सावंताच्या अज्ञानावरून आदित्य ठाकरेंनी झाप झाप झापले
Tanaji Sawant : ‘सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला लगेच आरक्षणाची खाज सुटली’; मराठा समाजाबाबत तानाजी सावंतांचे बेताल वक्तव्य
डोंगर पोखरून उंदीर निघाला! अवघे तीनच पदाधिकारी लागले तानाजी सावंतांच्या गळाला!