बॉलीवूडचे हॅंडसम हंग विनोद खन्नाच्या वडीलांनी ताणली होती त्यांच्यावर बंदूक; कारण ऐकून थक्क व्हाल

आज विनोद खन्ना आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांच्या आठवणी आणि चित्रपट नेहमी आपल्यासोबत असतील. विनोद खन्ना बॉलीवूडचे सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. ८० च्या दशकामध्ये विनोद खन्ना बॉलीवूडचे सर्वात हँडसम अभिनेते आहेत.

विनोद खन्नाला त्यांच्या अभिनयामुळे खुप जास्त प्रसिद्धी मिळाली होती. पण त्याचबरोबर विनोद खन्नाला त्यांच्या स्वभावासाठी देखील खुप ओळखले जायचे. कारण त्यांचा स्वभाव खुप प्रेमळ आणि शांत होता.

८० च्या दशकामध्ये विनोद खन्ना त्यांच्या करिअरच्या टॉपवर होते. त्यांचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता. ज्यांना विनोद खन्नाचे चित्रपट पाहायला आवडत होते. करिअरच्या सुरुवातीला विनोद खन्नाला देखील वाटले नव्हते की, त्यांना बॉलीवूडमध्ये एवढे यश मिळेल.

अभिनय क्षेत्रात येण्यासाठी त्यांना खुप मेहनत घ्यावी लागली होती. कारण त्यांच्या वडीलांना अभिनय हा शब्दच आवडत नव्हता. त्यामूळे अभिनेता बनण्याचा निर्णय घेणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.

विनोद खन्ना लहानपणापासूनच खुप मस्तीखोर होते. पण त्यांचे वडील मात्र खुप शिस्तप्रिय बिजनेस मॅन होते. त्यांना मुलांचा आगावपणा आवडत नव्हता. विनोद खन्नाने कॉलेजच्या दिवसांमध्ये ‘मुगले आ अझम’ चित्रपट पाहीला.

तो चित्रपट पाहील्यानंततर त्यांना अभिनेता बनण्याची इच्छा झाली. त्यांच्या वडीलांना त्यांना चांगले शिकवून यशस्वी बिजनेस मॅन बनायचे होते. विनोद खन्नाला मात्र बिजनेसमध्ये रुची नव्हती. त्यांच्या डोक्यावर अभिनयाचे भुत होते.

याच कालावधीमध्ये एका पार्टीमध्ये विनोद खन्ना आणि सुनिल दत्तची भेट झाली. त्यावेळी सुनिल ‘मन का मीत’ चित्रपटावर काम करत होते. विनोदला पाहताच त्यांनी मन का मीन चित्रपटामध्ये भावाच्या भुमिकेसाठी कास्ट केले.

आनंदी विनोद खन्नाने लगेच त्या ऑफरचा स्वीकार केला. ही गोष्ट ज्यावेळी त्यांनी घरी सांगितली. त्यावेळी वडील त्यांच्यावर खुप चिडले. त्यांना ही गोष्ट मान्य नव्हती. चिडलेल्या वडीलांनी काहीही विचार न करता विनोद खन्नावर बंदूक ताणली.

त्यावेळी बाप लेकाच्या भांडणामध्ये आईने हस्तक्षेप घेतला. म्हणून हे भांडण थांबले. नाही तर त्या दिवशी हे भांडण खुप जास्त वाढले होते. विनोद खन्नाच्या वडीलांनी त्यांना अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी पुर्णपणे नकार दिला होता.

पण शेवटी त्यांनी होकार दिला. होकार देण्याअगोदर त्यांनी विनोद खन्नासमोर एक अट ठेवली. त्यांनी सांगितले की, जर विनोदने दोन वर्षांमध्ये अभिनय क्षेत्रात यश मिळवले नाही. तर ते परत येऊन त्यांचा फॅमिली बिजनेस सांभाळतील.

विनोद खन्नाने देखील अट मान्य केली. त्यांनी मन का मीन चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यांचा पहीलाच चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यांची भुमिका नकारात्मक होती. पण तरीही प्रेक्षकांनी त्यांना पसंत केले होते.

पहील्या चित्रपटानंतर विनोद खन्नाने वीस चित्रपट साइन केले. त्यांचे हे पाहून देखील त्यांचे वडील आनंदी नव्हते. कारण त्यांना वाटले नव्हते की, विनोद खन्ना एवढे यशस्वी होऊ शकतील. पण त्यांनी मात्र वडीलांना चुकीचे ठरवले होते. आजही ते इंडस्ट्रीतील स्टार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

श्रीलंकन ब्यूटी जॅकलीन फर्नांडिसचा हॉट अंदाज; शेअर केला टॉपसेल फोटो

‘हम है नये अंदाज क्यों हो पुराना’ गाण्यावर पाठक बाईंचा धमाकेरदार डान्स; व्हिडीओ पाहून तुमचेही पाय थिरकतील

भारत सामना हारला ही गोष्ट सहन झाली नाही; म्हणून अभिनेत्याने गमावला होता जीव

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दाऊद इब्राहीमला आमिर खानने ‘असा’ दिला होता चकवा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.