अभिमानास्पद! खुल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

भारतीय महिला सगळ्यात गोष्टींमध्ये पुढे असतात, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने देशाचे नाव रोशन केले आहे. विनेशने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. यामुळे सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

पोलंड येथे सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत विनेशने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर तिने युक्रेनच्या खेळाडूला चितपट करत तिने विदेशात भारताचा तिरंगा फडकावला आहे. पोलंड येथे सुरू असलेल्या खुल्या कुस्ती स्पर्धेत भारताची विनेश फोगट आणि युक्रेनची ख्रिस्तियाना बेरेझाला यांच्यात अंतिम सामना रंगला होता.

अंतिम फेरीत भारताच्या विनेश फोगटने युक्रेनच्या ख्रिस्तियाना बेरेझाला ८-० अशी धुळ चारली. त्याचबरोबर तिने भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले आहे. हा सामना तिने एकतर्फी जिंकला आहे. तिने विरोधी खेळाडूला एकही गुण मिळवू दिला नाही. विनेशचे या मोसमातील हे तिसरे सुवर्णपदक ठरले आहे.

या मोसमात विनेशने तिसरे सुवर्णपदक पटकावत ऑलिंम्पिकसाठी भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मार्च महिन्यात मॅटेओ पोलिसॉन स्पर्धेत विनेशने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

दरम्यान, येत्या टोकियो ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताला कुस्ती आणि बॅडमेंटन या दोन खेळाकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा आहेत. अशाप्रकारे कामगिरी झाली तर नक्कीच भारताला सुवर्णपदक मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्या

माझ्या बायकोचे माझ्या भावोजीसोबत अफेअर होते; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे खळबळजनक आरोप

‘या’ शहरात मिळत आहेत फक्त 12 रुपयांमध्ये घर

लायसन्स काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता RTO टेस्ट न देताच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या कसं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.