“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”

मुंबई | चित्रपटसृष्टी तसेच उद्योगजगतातील मान्यवरांशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज चर्चा करणार आहेत. या चर्चेसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. उत्तर प्रदेशात मुंबईच्या धर्तीवर चित्रनगरी उभारण्याची योजना असून यावरूनच राजकारणही तापले आहे.

अशातच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्धव ठाकरेंना आव्हान तर नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही. शिवाय, मुंबई आणि फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी नसल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही…
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील योगी आदित्यनाथ यांना समज दिली आहे. “स्पर्धा करा, पण महाराष्ट्रातून ओढूनताणून काही नेऊ देणार नाही हे लक्षात ठेवा,” असे त्यांनी बजावले आहे.

याबाबत ते ‘इंडियन मर्चंट चेंबर ऑफ काॅमर्स’ यांच्या वतीने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उद्योजकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात काहीजण येत आहेत, पण त्यांना महाराष्ट्राची ‘मॅग्नेटिक’ ताकद काय आहे हे माहीत नाही. स्पर्धा करा आणि पुढे जा! पण ओढूनताणून जर कोणी काही घेऊन जात असेल तर ते आम्ही नेऊ देणार नाही.’

तसेच महाराष्ट्र हे एक वेगळे राज्य आहे. त्याला एक वेगळी संस्कृती आहे, संस्कार आहेत. यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाहीत. याउलट अन्य राज्यातील उद्योगच महाराष्ट्रात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड उत्तर प्रदेशला हलवण्याच्या प्रक्रियेला वेग, योगी आदित्यनाथ यांनी घेतली अक्षय कुमारची भेट
…तर महाराष्ट्राचे तुकडे नक्की होतील; मराठा आरक्षणावरून उदयनराजे आक्रमक
ट्रॅक्टर खरेदी करताय? जरा थांबा! ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देतंय पाच लाख रुपयांचे अनुदान…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.