Vinayak Raut : शिवसेनेत झालेल्या अनेक उलथापालथीनंतर शिवसेनेने महाप्रबोधन यात्रेला सुरुवात केली आहे. ठाण्यातील टेंभी नाका इथून या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत यांनीही शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, २००३ च्या जवळपास मी ठाण्यामध्ये संपर्कप्रमुख म्हणून काम केलेलं आहे. पण त्यावेळी आमच्या हातून एक मोठी चूक झाली. त्यावेळी सतीश प्रधान यांना बाळासाहेब ठाकरेंनी टिळा लावून एबी फॉर्म दिला होता.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांना तो टिळा लावला आणि एबी फॉर्म दिला. आम्हाला वाटलं ठीक आहे एक चांगला तरुण भविष्यात पक्षाला उपयोगी पडेल. पण ज्याला चांगलं म्हणायचं त्याने स्वार्थीपणाची आणि गद्दारीची बीजं महाराष्ट्रात रोवली, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.
पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघे यांनी आम्हाला श्रद्धा आणि भक्ती शिकवली. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला गद्दारील गाडायला पण आम्हाला शिकवले. तुम्हाला शिवसेना संपवण्यामध्ये आनंद आहे. ज्यादिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्याचा त्याग केला, त्याचवेळी हे ४० चोर गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये दारू ढोसून नाचत होते.
तसेच यावर्षी शिवतीर्थावरची सभा महाराष्ट्राबरोबरच अख्ख्या देशाने ऐकली. बीकेसी मैदानावरचे जे थोर पुरुषाचे भाषण होते, ते ऐकून मंत्री झोपले आणि आलेले लोक निघून गेले, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरही टीका केली.
पुढे त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही हल्लाबोल केला. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली त्यावेळी तुम्ही काय करत होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच तुमची उंची किती, डोकं केवढं? असे म्हणत राणेंवर हल्लाबोल केला.
महत्वाच्या बातम्या
vinayak raut : विनायक राऊतांच्या त्या वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक ; थेट आदित्य ठाकरेंकडे केली तक्रार
शिवसेना नेते विनायक राऊत यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सोन्याची चेन आणि पैसे उकळले
स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येते का? विनायक राऊतांचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला
उदय सामंत टक्केवारी घेऊन काम करतात, राणे समर्थकांना पोसतात, राऊतांचा गंभीर आरोप