‘परमबीर सिंग नावाचं जे रसायन आहे, हेच मुळात भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे’

मुंबई : काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक खुलासे केले होते. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी या पत्रातून केला आहे.

यानंतर राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले. तर दुसरीकडे भाजपाच्या सदस्यांनी सभागृहात आज महाविकासआघाडी सरकारवर आरोप करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेतील गदारोळानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेतली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘दुर्देवाने सभापतींनी मला एकट्यालाच केवळ एक मिनिट बोलण्याची संधी दिली. त्यामुळे परमबीर सिंग बद्दल जी महत्वाची बाब मला मांडायची होती. ती मांडायचा आम्ही प्रयत्न केला परंतू तिथं संधी मिळाली नाही म्हणून माध्यमांद्वारे सर्व जनतेसमोर आम्ही ती मांडत आहोत.’

दरम्यान, ‘परमबीर सिंग हे भ्रष्टाचारी अधिकरी आहेत, हे परमबीर सिंग नावाचं जे रसायन आहे, हेच मुळात भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे,’ असा आरोप त्यांनी केला. तसेच, परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकारी अनुप डांगे यांना त्रास दिला असल्याचेही राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत अजितदादांची सभा; आयोजकांविरोधात गुन्हा दाखल

अजित पवारांची आयोजित केली सभा, अन् दाखल झाला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाविरोधात गुन्हा

चाहत्याने जान्हवी कपूरकडे केली नको ती मागणी; जान्हवीचे उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.