Share

Vinayak Mete : ”मला साहेबांचं अखेरचं दर्शन घेऊद्या, मला त्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊद्या”

Vinayak Mete

Vinayak Mete : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर हा अपघात झाला. दरम्यान, आज दुपारी त्यांचा अंत्यसंस्कार पार पडला.

यावेळी विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम यांनी मला मालकाचे शेवटचे दर्शन घेऊद्या असा टाहो फोडला. एकनाथ कदम हे पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या चौकशीकरिता पोलीस दाखल झाले होते.

एकनाथ कदम पोलिसांकडे “मला इथे का ठेवलंय, मला काही होत नाही. मला साहेबांचं अखेरचं दर्शन घेऊ द्या. मला त्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ द्या”, अशी विनवणी करत होते. पोलिसांना विनवणी करत असताना ते खूप रडत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. विनायक मेटे या बैठकीला हजर राहण्याकरिता बीडहून मुंबईकडे येत होते. परंतु, मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली व यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

विनायक मेटेंसोबत त्यांचे वाहनचालक एकनाथ कदम आणि बॉडीगार्ड राम ढोबळे हे होते. ते दोघेही जखमी झाले आहेत. पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात एकनाथ कदम यांच्यावर तर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक इथे राम ढोबळे यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेली अनेक वर्षे एकनाथ कदम हे विनायक मेटे यांच्याकडे चालकाचे काम करत होते. एकनाथ कदम यांच्यावर विनायक मेटेंचा फार जीव होता. कदम यांनी मेटेंना अनेक दौऱ्यांमध्ये साथ दिली होती. त्यामुळेच साहेबांचे अखेरचे दर्शन घेऊ द्या असे म्हणत ते टाहो फोडत होते.

महत्वाच्या बातम्या
”हात नाही तोडता आला तर पाय तोडा, दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करून देतो”
Narendra Modi: जगातील सर्वात सुरक्षित कारने मोदींची लाल किल्ल्यावर ग्रॅंन्ड एन्ट्री, जग पाहतच राहिले
Road hipnosis : रोड हिप्नोसिसमुळे झाला विनायक मेटेंचा अपघात? त्यापासून बचाव कसा करायचा? वाचा सविस्तर..
आमदार संतोष बांगर संतापले, शिवीगाळ करत थेट लगावली कानशिलात, व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now