विप्रो कंपनीत काम करणारा विनायक माळी उर्फ दादूस कसा झाला कॉमेडीचा बादशहा?

सध्या लॉकडाऊनच्या काळात विरंगुळा म्हणून सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे. त्यामध्ये फेसबुक, इंस्ताग्राम, युट्युब अश्या वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजन होते. आपापल्या पसंतीनुसार वेगवेगळ्या गोष्टीना प्राधान्य दिले जाते.

सध्या सोशल मिडीयावर एका आगरी कॉमेडी किंगची हवा आहे त्याच नाव ‘विनायक माळी’. आगरी कोळी भाषेत बोलणारा सतत त्रस्त असलेला हा मराठी माणूस स्वतः वर जोक करून इतरांची मने जिंकणाऱ्या या कलाकाराविषयी जाणून घेऊ.

विनायक माळीचा जन्म पनवेल मध्ये २२ सप्टेंबर १९९५ साली एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील कोर्टात सरकारी नौकरी करतात. नौकरीमुळे त्याचे सहकुटुंब ठाण्यात राहायला आहे. त्याच संपूर्ण शिक्षण शिक्षण ठाण्यात झाल आहे. त्याने एलएलबी पदवी प्राप्त केली आहे.

कॉलेजमध्ये असताना त्याने सेकंड इयरला असताना एक शोर्ट फिल्म बनवली. त्यात त्याला चांगलच यश मिळाल. त्यामुळे पुढ त्याने यातच करीयर करायचं ठरवल. हे करियर निवडल असल्यामुळे त्यांना यात ज्ञान प्राप्त करण गरजेच होत. त्याने ऍड एजन्सीमध्ये फ्री लँसिन्ग केलं आहे. त्यामुळे त्याला करियर कामात आणि व्हिडिओ एडिटिंग करण्यात खूप फायदा झाला.

विनायक माळी विप्रो ह्या कंपनीत जॉब देखील करत होता पण जॉबचा आणि त्याला आवड असलेल्या कामाचा मेळ बसत नव्हता म्हणून त्याने चांगल्या पगाराची नौकरी सोडली आणि आपल्या आवडत्या क्षेत्राकडे भर देण्याचे ठरवले. पुढ काय होईल याची त्याला कल्पनाही नव्हती.

सुरुवातीला त्याने हिंदी व्हिडिओ बनवले पण त्यात त्याला अपयश आले. नंतर त्याने आपल्या आगरी कोळी माय-भाषेत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. हे काम करताना त्याला त्याच्या अनेक मित्रांनी मदत केली.

सुरुवातीला प्रेक्षकांच्या आवडी-निवडीच बारकाईने निरीक्षण केले आणि तसे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. विनोद हा स्वतःवर करता आला पाहिजे हे त्याने ओळखल. आणि जोमाने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

‘आम्ही आगरी कोळी पोरं’ हा त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. ह्या व्हिडिओ पाठोपाठ ‘दादूस गेला जिमला’, ‘माझी बायको’, हे व्हिडिओ तुफान गाजले. त्यानंतर त्याने केलेले ‘दादूस गेला पत्रिका वाटायला, दादूस गेला कर्नाळ्याला, दादूस गेला हळदीला असे एका पाठोपाठ एक व्हिडिओ व्हायरल झाले.

विनायकची एक खास गोष्ट म्हणजे तो वेगवेगळ्या स्पॉट वर जाऊन व्हिडिओ शूट करतो आणि तेथील लोकांना त्यामध्ये सहभागी करतो. त्यामुळे त्याचे व्हिडिओ खुप व्हायरल होतात. आणि ते खरे देखील वाटतात.केवळ वैतागलेल्या माणसाचीच नाही तर शेठ माणसाची भूमिकाही त्याने उत्कृष्ट रित्या साकारली.

‘काय र भाई’ आणि ‘शेठ म्हणा शेठ’ या दोन वाक्यांनी तर धुमाकुळच घातला आहे. त्याची भाषा त्याची स्टाईल त्याच बरोबर तो व्हिडिओ बनवतो ती ठिकाणे सर्व काही जुळवून घेतो हेच त्याच्या व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं रहस्य आहे. अनेक टीव्ही शोमध्ये त्याला बोलावल जात आहे तसच अनेक मराठी चित्रपटांच प्रमोशन करण्यासाठी त्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात.

हे ही वाचा-
कोरोना संक्रमित नवऱ्यापासून लांब नाही राहू शकली शिल्पा; बिंधास्त केले किस, पहा फोटो
विहिरीतून पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांचा भन्नाट जुगाड; पहा तुफान व्हायरल व्हिडिओ
शिव नादर: खाजगी नोकरी सोडून मित्रांच्या मदतीने सुरू केली कंपनी, आज आहेत १.७० लाख कोटींचे मालक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.