शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा मिळवून देत असतात. पण सामान्य गुंतवणूकदारांना या शेअर्सबद्दल जास्त माहिती नसते. असाच एक शेअर vinati organics कंपनीचा आहे. या केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे.(vinati organics company share gives huge profit to investor)
vinati organics या केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना तब्बल २,००,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची किंमत सुरवातीला ७५ पैसे इतकी होती. आज या शेअर्सची किंमत सुमारे २००० रुपये झाली आहे. या कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,२८९.५५ रुपये आहे.
vinati organics या केमिकल कंपनीत एक लाख रुपये गुंतवणारे लोक आज करोडपती झाले आहेत. ७ नोव्हेंबर २००३ रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर या शेअरची किंमत फक्त ७५ पैसे होती. १९ मे २०२२ रोजी या शेअरची किंमत वाढून २,०४६.१० रुपये झाली आहे. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी २,००,००० टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने ७ नोव्हेंबर २००३ रोजी vinati organics या केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला २७.२८ कोटी रुपये मिळाले असते. vinati organics या केमिकल कंपनीच्या समभागांनी 9 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला ४५.५८ लाख रुपये मिळाले असते. vinati organics या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत सध्या २००० रुपयांच्या पुढे गेली आहे.
येत्या काळात देखील vinati organics या केमिकल कंपनीच्या शेअरच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते, असे मत शेअर मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. vinati organics ही केमिकलचे उत्पादन करणारी कंपनी आहे. vinati organics या केमिकल कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई शहरातील वांद्रा या ठिकाणी आहे.
महत्वाच्या बातम्या :-
विचित्र प्रथा: बाप मुलीला वाढवतो आणि वयात आल्यावर तिच्यासोबतच करतो लग्न, वाचून हादरून जाल
टीम डेव्हिडला फाफ डु प्लेसिसने पाठवला होता ‘हा’ मेसेज, त्यानंतर त्याने खेळली तुफानी खेळी
११०५ कोटींना विकली गेली ‘ही’ खास मर्सिडीज कार, मालकालाही नाही चालवायची परवानगी