विहिरीतून पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांचा भन्नाट जुगाड; पहा तुफान व्हायरल व्हिडिओ

भारताते काही व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा ट्रेंड करत असतात. काम अवघड असो वा सोपी पण भारतातील लोक प्रत्येक कामात जुगाड करत असतात. या जुगाडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस विहिरीतून पाणी काढत आहे. पण यावेळी हाताला जास्त कष्ट पडावे नाही,म्हणून त्याने एक जुगाड केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या माणसाचे काम आणखी सोपे झाले आहे.

आपल्याला विहिरीतून पाणी काढणे खुप सोपे वाटते. पण त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, हे पाणी काढणाऱ्यालाच समजत असते. पण जुगाड केला तर अशक्य कामही शक्य होते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी प्रवीण कसवान यांनी शेअर केला आहे. कसवान यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत असे लिहिले आहे की पाण्याची किंमत… भौतिकशास्त्र वापरून काम कसे सोपे केले आहे ते बघा. यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही जागा राजस्थानमधील आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे, की एक व्यक्ती विहिरीतून पाणी काढत आहे. विहिरीपासून काही अंतरावर दोन दांड्यांच्या साहाय्याने एक मोठे लाकूड बांधलेले आहे. त्याला एका दोरीने एक बादली बांधलेली आहे. लाकूडच्या वजनाने ती बादली पाण्यातून काढणे सहज शक्य होते, त्यामुळे कोणालाही विहिरीतून पाणी काढायचे असेल, तर त्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३० हजाराहून लोकांनी बघितले आहे. या व्हिडिओ अनेक लोकांनी मजेदार कमेंटही केल्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

२५ लोकांची खिंड एकट्या नवरदेवाने लढवली, पुर्ण मंडपात एकटाच वेड्यासारखा नाचला, पहा व्हिडीओ
केंद्राने डोस कमी दिले असले तरी राज्य लसीकरणात पहिल्या नंबरवर, जाणून घ्या आकडेवारी
साताऱ्यात राडा! मराठा आंदोलकांनी मंत्र्याच्या घरावर फेकले शेण, काँग्रेस राष्ट्रवादीच्या, कार्यालयावर दगडफेक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.