काय सांगता! हिऱ्याच्या शोधात गावकऱ्यांनी खोदला डोंगर, आणि …

दक्षिण आफ्रिकेतील येथील क्वाज़ुलु-नताल प्रांतांतील क्वाहथी या गावात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एका शेतकऱ्याला शेतात हिरा सापडला. यामुळे गावातील जमिनीत हिरे सापडत असल्याचा अफवा पसरली आणि गावकऱ्यांनी संपूर्ण गावच खोदायला घेतले.

मात्र हिऱ्यासाठी हव्यासापोटी अनेकांनी शेत खोदून स्वत;च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी माणूस काय करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही गोष्ट आहे. या गावात बाराही महिने दारिद्र्य असून शेती हाच गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे.

मात्र त्या ठिकाणी शेतीही अनियमित आहे. यामुळे येथील गावकऱ्यांना कामासाठी बाहेर जावे लागते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. याच दरम्यान, एका शेतकऱ्याला शेतात खोदकाम करताना एक दगड सापडला. क्वार्ट्ज क्रिस्टल असे त्याचे नाव असून तो अमूल्य असल्याचे एकाने सांगितले.

यामुळे हिरे तयार होतात. असे एका गावकऱ्याने शेतकऱ्याला सांगितले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. हा दगड बघण्यासाठी गावकऱ्यांनी शेतात तुफान गर्दी केली. यामुळे सगळीकडे ही बातमी पोहोचली. आणि एकच खळबळ उडाली.

त्यानंतर सगळेजण कुदळ आणि फावडे घेऊन मोकळी जमीन खोदत आहे. काहींनी तर शेतच खोदायला सुरूवात केली असून हजारो हेक्टर शेती खणल्याने स्वत:चे नुकसानही करून घेतले आहे. दरम्यान, गावात हिरा सापडल्याचे कळताच दक्षिण अफ्रीका सरकार सक्रीय झाली आहे.

त्यानंतर उत्खन्नन विभागाने भूवैज्ञानिकांची एक स्पेशल टीम गावात पाठवली आहे. ते देखील याबद्दल अभ्यास करत आहेत. यामुळे ही बातमी सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.

ताज्या बातम्या

कोरोनाची तिसरी लाट भारतात येणारच नाही, पैज लावून सांगतो; भारताच्या वाॅरन बफेटची भविष्यवाणी

सकाळी तक्रार आणि संध्याकाळी निर्णय, अजितदादांनी एकाच दिवसात मिळवून दिला न्याय..

हिंदू मुलासोबत लग्न करणाऱ्या मुस्लिम तरुणीला घरच्यांनीच दिली शिक्षा; सख्ख्या भावानेच केलं धक्कादायक कृत्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.