महाराष्ट्रातील(Mahrashtra) लातूर जिल्ह्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. लातूरमधील( Latur) एका गावात तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतले व नारळ वाढवला. या क्षुल्लक कारणावरून गावानेच त्या तरुणावर आणि त्याच्या कुटूंबियांवर बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. ही घटना निलंगा(Nilanga) तालुक्यातील ताडमुगळी या गावात घडली आहे.(villagers boycott family in latur)
गावातील संपूर्ण समाजाने या तरुणाच्या कुटूंबाला तीन दिवस वाळीत टाकले होते. या तरुणाच्या कुटुंबातील एका सदस्याने या घटनेची माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बहिष्कार टाकल्यानंतर पीडित कुटूंबाला साधे पीठही दळून दिले नाही, अशी माहिती त्या सदस्याने व्हिडिओमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करत गावकऱ्यांना समज दिली आहे. गावातील एका समाजातील तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या कारणावरून गावकऱ्यांनी तरुणाच्या कुटूंबियांवर बहिष्कार टाकला. अद्याप याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल झालेला नाही. पण या प्रकारामुळे समाज व्यवस्थेची काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे.
राजकीय नेते किंवा सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या भाषणामध्ये समाज व्यवस्थेत बदल झाल्याचे सांगतात. पण गावामधील वास्तव मात्र वेगळेच आहे, हे या घटनेमुळे समोर आले आहे. निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात एका विशिष्ट समाजातील तरुणाने मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि नारळ वाढवला.
या कारणामुळे गावकऱ्यांनी त्या तरुणाच्या कुटूंबाला वाळीत टाकले. त्या कुटूंबाला गावात कोणत्याही वस्तू मिळू नयेत, याची व्यवस्था करण्यात आली. गावकऱ्यांना त्या तरुणाच्या कुटूंबाला बहिष्कृत केले आहे, याची माहिती व्हावी यासाठी गावात दवंडी पिटवण्यात आली. त्यामुळे या तरुणाच्या कुटूंबाला तीन दिवस किराणा माल मिळाला नाही.
या कुटूंबातील एक सदस्य गिरणीमध्ये दळण दळून आणण्यासाठी गेला होता, त्यावेळी त्याला दळण देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली. या कुटुंबातील एका महिलेने जाब विचारला असता, तिला विरोध करण्यात आला. गावातील कोणीही बहिष्कृत कुटूंबाला मदत केली, तर त्याला ५० हजाराचा दंड बसेल, असा फतवा गावकऱ्यांनी काढला होता.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! लतादीदींची प्रकृती बिघडली, पुन्हा ठेवण्यात आले व्हेंटिलेटरवर, डॉक्टर म्हणाले..
“बंडातात्यांच्या वक्तव्या पाठीमागचा बोलावता धनी दुसराच कुणीतरी”; कोण आहे तो?
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल, कारण वाचून धक्का बसेल