मुंबई | राज्यात गेल्या काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर, सांगवी, अक्कलकोट इथल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि गावाचे नुकसान झाले आहे.
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. अशात मुख्यमंत्री सांगवी खुर्दच्या पाहणीसाठी गेले असता, सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीला बोरी नदीच्या पुलावर येण्यास सांगितले जात आहे, यावर ग्रामस्थांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या दौऱ्याची सुरुवात सांगवी खुर्द या गावातून करणार होते. मात्र प्रशासनाने गावकऱ्यांनाच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पूलावर यायला सांगितल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री गावात आले तर ठीक आम्ही तिकडे जाणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनीच गावाच्या भेटीला यावे, अशी मागणी गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नियोजित केलेल्या कार्यक्रमात सांगवी खुर्द या गावापासून सुरुवात करण्याचे ठरवले होते, मात्र शासकीय अधिकारी आता ऐनवेळी कार्यक्रम बदलत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना गावात न येता गावात पावसामुळे झालेले नुकसान कसे दिसणार, असा मुद्दाही ग्रामस्थांनी मांडला आहे.
महत्वाच्या बातम्या-
खरचं भात खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या यामागचे सत्य
रिकाम्या पोटी लसून खाल्ला तर ‘ह्या’ गंभीर आजारांपासून होईल कायमची सुटका