येथे फक्त महिलांचेच राज्य! या गावात पुरूषांना पाय ठेवण्यास आहे बंदी

महिला आणि पुरूष समान आहेत त्याच्यांत भेदभाव करू नका असे आपण कितीवेळा म्हणालो तरी जगात बऱ्याच ठिकाणी आजही महिला आणि पुरूषांमध्ये भेदभाव केले जातात. कुठे ना कुठे महिलांना आपल्या हक्कांसाठी लढावेच लागते.

तर दुसरीकडे पुरूषही या वादाच्या भोवऱ्यात आपल्याला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही देशांमध्ये महिलांना समानतेचा हक्क मिळाला पण काही ठिकाणी आजही परिस्थिती बिकट आहे. पण असा एक देश आहे त्या देशातील एका गावात फक्त महिलांचे राज्य आहे.

आफ्रिकी देश केनयामध्ये एका गावाबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. उमोजा असे त्या गावाचे नाव आहे. हे गाव उत्तरी केनियामध्ये समबूरूमध्ये आहे. तुमच्या माहितीसाठी स्वाहिलीमध्ये उमोजाचा अर्थ एकता होतो.

या गावात फक्त आणि फक्त महिला राहतात. या गावात पुरूषांना येण्यास सक्त मनाई आहे. एवढच काय तर गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी या गावाच्या चारही बाजूला काटेरी कुंपण लावण्यात आले आहे. या गावात सुरूवातीच्या काळात फक्त १५ महिला होत्या.

या महिलांची एक कहाणी आहे. या महिलांवर १९९० मध्ये ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार आणि लैगिंक शोषण केलं होतं. पण आज हेच गाव पीडित महिलांसाठी एक आसरा बनले आहे. या ठिकाणी महिला आपले जीवन आनंदाने जगतात.

त्यांना तेथे सगळ्या प्रकारची स्वतंत्रता आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या गावात फक्त त्याच महिला राहतात ज्यांचा छळ झालेला आहे, शोषण झाले आहे किंवा त्यांच्यावर बलात्कार, हिंसा, बालविवाह झाला असेल अशाच महिला या ठिकाणी राहतात.

या गावात सध्याच्या घडीला ५० महिला राहतात. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही राहतात. या मुलांची संख्या २०० च्या आसपास आहे. या महिला कोणावरही निर्भर राहत नाहीत. पोट भरण्यासाठी त्यांची मुलेही त्यांना मदत करतात.

मुलगा १८ वर्षांचा झाल्यानंतर त्याला गाव सोडावं लागतं. हे गाव जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळे या गावाला पाहण्यासाठी पुर्ण जगातून लोक येत असतात. या महिला स्वत:चा व्यवसाय करतात. मोत्यांचे दागिने बनवून ते दागिने विकून या महिला कमाई करतात.

त्यामध्ये पैंजण, नेकलेस, बांगड्या यांचा समावेश आहे. तसेच येथील महिला जबरदस्ती गर्भपात करणे काय असते? याबद्दल माहिती देतात. या महिलांनी गावात एक शाळाही खोलली आहे. या गावातील महिली बनवलेले सामान विकायला शेजारील गावात जातात.

या गावाने जगभरात एक वेगळं उदाहरण निर्माण केले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला भेट द्या.

महत्वाच्या बातम्या
चीनच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही तेवढा शेतकऱ्यांसाठी लावलाय; राज ठाकरेंचा केंद्रसरकारवर हल्लाबोल
मुंबईचा हा पठ्या एक दिवसासाठी बनतो भाड्याचा बॉयफ्रेंड, आतापर्यंत एवढ्या मुलींना केलंय डेट
..त्यामुळे “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहीम थांबवा’’ रतन टाटांचे भावनिक अवाहन
राष्ट्रीय पुरस्कार मिळत नसल्याने गायक कुमार सानुंनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.