या गावाची राज्यात चर्चा! गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा ग्रामपंचायतीचा निर्णय

नाशिक । राज्यात सध्या कोरोनाने हाहाकार उडवला आहे. अनेकांना ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्णांचे मृत्यू होत आहेत. असे असताना नाशिकच्या एकलहरे ग्रामपंचायतीने भविष्यात शौचालयाप्रमाणेच एक ऑक्सिजन बेड तयार करणे बंधनकारक केले आहे.

ग्रामपंचायतीने केवळ बंधनकारक केले नाही तर बेडची व्यवस्था करणाऱ्याला घरपट्टीमध्ये सूटही देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात रुग्णालयात ऑक्सिजन मिळेलच यावर अवलंबून न रहाता जीव वाचविण्यासाठी एक आधार होणार असल्याचे ग्रामपंचायत सरपंच मोहिनी जाधव यांनी सांगितले आहे.

या गावातील ग्रामपंचायत सदस्या असलेल्या रत्नाबाई दिलीप सोनवणे यांना कोरोना झाला होता. त्यांना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावकऱ्यांनी बोध घेतला आहे.

यामुळे सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या व्यक्तीला नवीन घर बांधायचे असेल त्यांनी एक ऑक्सिजन बेड तयार करावा लागणार आहे. यामध्ये हा बेड बांधल्यानंतर त्यांना घरपट्टीमध्ये सूट देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या गावाची राज्यात चर्चा सुरू आहे. असा ठराव करणारे हे पहिलेच गाव आहे. राज्यात देखील अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी अनेकांचे मृत्यू झाले.

ताज्या बातम्या

आईसाठी काय पण! स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक बब्बरने छातीवर गोंदवले आईचे नाव

घराच्या छतावर सुरू केला बटेर पालनाचा व्यवसाय, आता महिन्याला कमावतोय लाखो

नरेंद्र मोदींना नेतृत्व कसे करावे कळत नाही, मोदीजी राजीनामा द्या; कंगणाची धक्कादायक मागणी

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.