‘त्या’ एका शापामुळे सुनसान झाले गाव, आता रात्रीचे येतात भितीदायक आवाज

आजीने किंवा आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही शाप हा शब्द ऐकला असेल. पण तुम्हाला काय वाटते की शाप आजच्या काळातही काम करत असेल का? जर एखाद्याने दुखात किंवा रागात एखाद्याला शाप दिला तर तो शाप खरा होऊ शकतो का? हे फक्त गोष्टींमध्येच ऐकायला चांगलं वाटतं.

पण जर आम्ही म्हणालो ही गोष्ट १०० टक्के खरी आहे आणि हे एका ठिकाणी घडले आहे. हे आपल्याच देशात घडले आहे. राजस्थानमधील जैसलमैर येथून १८ किलोमीटर दूर एक गाव आहे त्याचे नाव आहे कुलधरा.

या गावाच्या रहस्याला १७० वर्षांत कोणीच उलगडू शकले नाही. हे गाव मेहनती, बुद्धीवान ब्राम्हणांनी १२९० मध्ये निर्माण केले होते. येथे पालीवाल ब्राम्हण आनंदाने राहत होते. त्यांच्या समुदायाच्या अंतर्गत ८४ गाव यायचे आणि हे गावसुद्धा त्या गावांचा एक हिस्सा होता.

पण या गावाला नजर लागली दीवान सालम सिंह या माणसाची. या दीवानाची एका ब्राम्हणाच्या मुलीवर नजर पडली. त्या दिवानाला त्या मुलीशिवाय काही सुचतच नव्हते. रात्रंदिवस तो तिचाच विचार करायचा. त्याने त्या मुलीचा हात तिच्या वडिलांशी मागितला आणि अट ठेवली की जर तुम्ही लग्नाला नकार दिला तर मी सकाळी सकाळी येऊन तुमच्या मुलीला जबरदस्तीने घेऊन जाईल.

ब्राम्हणांना त्याचा सामना करणे अशक्य होते पण आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. त्यांनी रात्री एक सभा घेतली आणि निर्णय घेतला की गाव सोडून जाऊ पण आपल्या मुलीला त्या दिवानाला कधीच सोपवणार नाही.

सकाळी त्या गावात कोणीच नव्हते. सगळीकडे शांतता पसरली होती. जाता जाता ब्राम्हणांनी त्या गावाला शाप दिला की ते हे गाव सोडून जात आहेत पण यानंतर त्या गावात कोणीच राहू शकणार नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या गावात आजपर्यंत कोणीच राहू शकले नाही.

आता सध्या ते एक पर्यटनाचे ठिकाण आहे. जो पण त्या ठिकाणी जातो त्याला असे वाटते की त्याच्या जवळपास कोणीतरी चालत आहे, त्याला कोणीतरी बघत आहे. पण कोणालाही काहीच दिसत नाही.

एका रात्रीत हे गाव खिंडार बनले होते आणि यामागील रहस्याचा आजपर्यंत कोणीच उलगडा करू शकले नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
बाबो! शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बोलण्यासाठी रिहानाला मिळाले तब्बल १८ कोटी रूपये
तुला पाहते रे…! अभिज्ञा भावेचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ; पहा व्हिडीओ
आरारारा राडा! १०० कोटी घेत साऊथ सुपरस्टार ‘विजय देवरकोंडा’ची बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री
चहा विकून घर चालवते योगी आदित्यनाथ यांची बहीण, पुढची कहाणी वाचून डोळ्यात पाणी येईल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.