भारतातील हे अनोखे गाव विभागलय दोन देशांमध्ये; गावच्या लोकांकडे आहे दोन्ही देशांचे नागरिकत्व

जगात अनेक गाव आहेत. जी एकमेकांपेक्षा खुप वेगळी आहेत. या गावांची संस्कृती वेगळी आहे. वातावरण वेगळे आहे. म्हणून या सर्व गावांना एक वेगळी ओळख आहे. अशाच एका गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

या गावाचे नाव जगातल्या सगळ्यात वेगळ्या गावांच्या यादीत येते. या गावाची खासियत म्हणजे हे गाव दोन देशांमध्ये विभागले गेले आहे. याच गोष्टीमूळे हे गाव खुप प्रसिद्ध आहे.

या गावाचे नाव आहे ‘लोंगवा’. या गावातील नागरिकांकडे दोन देशांचे नागरित्व आहे. यामूळेच हे भारतातील सर्वात वेगळे गाव आहे. हे गाव भारतातील नागालँड राज्यात आहे. लोंगवा गाव भारत आणि म्यानमार या दोन देशांमध्ये विभागले गेले आहे.

या गावात ‘कोयांक’ आदिवासी समाजाचे लोक राहतात. कोयांक समाजातील आदिवासींना हेड हंटर्स देखील म्हंटले जाते. कारण या समाजातील लोक जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी लोकांचे शीर कापतात.

या गावातील प्रत्येक नागरिक भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांचा नागरिक आहे. तत्कालीन आधिकाऱ्यांनी या गावातूनच सीमा रेषा काढली होती. मात्र या गावातील लोकांना काहीही फरक पडला नाही.

या गावाच्या मध्येभागी सीमेरेषेचे पिलर्स उभे आहेत. या पिलर्सवर एका बाजूनी हिंदीमधून लिहिले आहे. तर दुसऱ्या बाजूला बार्मीजमध्ये संदेश लिहिला आहे. येथील सरपंच अनेक गावांचे प्रमुख आहेत.

विशेष म्हणजे या गावातील सरपंचाचे घर दोन्ही देशातील सीमेरेषेवर आहे. म्हणून असे म्हंटले जाते की, या गावचा सरपंच जेवतो भारतात आणि झोपतो म्यानमार देशात. सरपंचांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचा अधिकार आहे.

या गावात भारत आणि म्यानमार दोन्ही देशातील शाळा आहेत. नागरिकांकडे भारताचे मतदान कार्ड आणि आधार कार्ड आहे. दोन्ही देशातील सैनिक या गावात तैनात असतात. या सर्व कारणांमुळे हे गाव जगातील सर्वात वेगळ्या गावांपैकी एक आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

..म्हणून त्या दिवशी करिष्माने शाहीद कपूरला सेटवरून हाकलून दिले होते; जाणून घ्या कारण..

रविना टंडनने दाखवला बाॅलीवूडचा खरा चेहरा; सांगीतली तिच्यासोबत झालेली धोकेबाजी

ऐश्वर्या राय चक्क विवाहीत शिक्षकाच्या प्रेमातच वेडी झाली होती; स्वत:च दिली कबूली

तारक मेहतातील जेठालालचे मानधन ऐकून होश उडतील; मोठमोठ्या सेलिब्रीटींना टाकलय मागे

सुशांत प्रकरणात बाॅलीवूड अभिनेत्याचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.