लष्करातील मेजर ते प्रसिद्ध अभिनेते असा झंझावाती प्रवास करणारे विक्रमजीत कंवरपालांचे कोरोनाने निधन

देशात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. अनेकांचे मृत्यू कोरोनाने झाले आहेत. आता अभिनेते आणि माजी सैनिक अधिकारी बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला.

त्यांनी अभिनय क्षेत्रात आपले नाव कोरले आहे. डॉन, मर्डर २, क्रिएचर, पेज ३, यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली होती. चित्रपट क्षेत्रात येण्याआधी ते बिक्रमजीत हे सैन्यात कार्यरत होते.

कंवरपाल यांनी क्राईम पेट्रोल दस्तक, अदालत, दिया और बाती हम, सियासत, ये है चाहते, यांसारख्या मालिका आणि वेब सीरिजमध्येही दमदार भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

चित्रपटांसोबतच त्यांनी मालिका आणि वेब सीरिजमध्येही काम केले. वेबसिरीजमध्ये त्यांनी नाव कमवले आहे. २००२ पर्यंत त्यांनी सैन्यात काम केले. अभिनयाची त्यांना बालपणापासून फार आवड होती. याच आवडीमुळे त्यांनी सेवानिवृत्तीनंतर चित्रपटांत काम करायला सुरुवात केली.

कंवरपाल यांचा हिमाचल प्रदेशमध्ये जन्म झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ कंवरपाल हे सुद्धा सैन्य अधिकारी होते. १९८९ साली बिक्रमजीत यांनी सैन्यात प्रवेश केला आणि २००२ पर्यंत ते कार्यरत होते.

त्याच्या जाण्याने कला अभिनय क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या अभिनयप्रेमीचा मृत्यू झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे. देशातील अनेक कलाकारांचे कोरोनाने मृत्यू झाले आहेत.

ताज्या बातम्या

कपडे काढ मला तुझे पुर्ण शरीर बघायचे आहे; कास्टिंग काऊचबद्दल अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

मधूचंद्राच्या दिवशीच ताप आला अन् नवरदेवाचा झाला मृत्यु; नवरीचा संसार झाला काही तासातच उध्वस्त

मोठी बातमी! अहमदनगरमध्ये बॉम्बस्फोट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.