शाहरूख खानला घाबरण्यासाठी मी कोणाच्या बापाचं नाव लावत नाही, विक्रम गोखले संतापले

कंगना रणावतच्या स्वातंत्र्याच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्यानंतर मराठी अभिनेते विक्रम गोखले वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. आता त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. ते म्हणाले आहेत की, २०१४ पासून देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे.

मी त्यावर ठाम असून ते मी बदलणार नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मूळ भाषणात मी काय म्हणालो ते दाखवण्यात आलेलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं विक्रम गोखलेंनी स्पष्ट केले आहे. आज मुंबईमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यांची मुलगी नेहा गोखलेही त्यांच्यासोबत होती. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी माझ्या मुलीला घेऊन आलो आहे असं ते सुरूवातीला म्हणाले. पुढे ते म्हणाले की, कंगनाची दोन वर्षातली मतं तिची वैयक्तिक आहेत. स्वातंत्र्याबद्दल तिनं व्यक्त केलेल्या मताचा वैयक्तिक कारणं आहेत.

तिचं समर्थन करताना माझी कारणं वैयक्तिक आहेत. मी तिला ओळखतही नाही. मी केवळ तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. तो माझ्या अभ्यासाच्या आधारे दिला. १८ मे २०१४ च्या गार्डियनमध्ये जे लिहीलंय तेच कंगना बोलली होती. ती काही चुकीचं म्हणाली नाही एवढंच मी म्हणालो. मी त्या मतावर आजही ठाम आहे.

२०१४ पासून जागतिक पटलावर सक्षम उभं राहायला सुरूवात झाली, असंही गोखले म्हणाले. मी तोंडफाटका माणूस आहे, मला ओठ शिवता येत नाहीत. त्यामुळंच माझी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही. गेल्या ३० वर्षात मला अनेक राजकीय पक्षांचे निरोप आले पण मी गेलो नाही. कंगनाचे समर्थन करून मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असं बोलणं चुकीचं आहे.

माझ्या मुळ भाषणात मी काय बोललो हे दाखवलं गेलेलं नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असं  कुणाला वाटत असेल तर दे  दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल हे गीत म्हणताना, ज्यांची अवहेलना झाली त्यांचं काय? तेव्हा आपल्याला शरम वाटली नाही का? असा सवाल करत त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना झापले.

शाहरूख खान आणि आर्यन खानबाबत बोलताना विक्रम गोखले म्हणाले की, माझ्यासाठी शाहरूख खान आर्यन खान आणि त्यांच्यासंदर्भात जे काही चालू ते अतिशय शुल्लक आहे. शाहरूख आणि आर्यन काय बॉलिवूडमधील कुठलाही नट माझं काहीही वाकडं करू शकत नाही. जर कोणी करायचं प्रयत्न केला तर मी माझं नाव विक्रम चंद्रकांत गोखले असं लावतो. दुसऱ्या कोणाच्या बापाचं नाव मी लावत नाही, असंही विक्रम गोखले यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
…तर भारत देश जिहादी बनेल; कंगना पुन्हा बरळली
नमाज पढण्यासाठी हिंदू व्यक्तीने दिले दुकान; म्हणाला जागा कमी पडत असेल तर घर, अंगनही देईल
धक्कादायक! महिला आमदाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर उडाली खळबळ
रामसेतूच्या शूटिंगदरम्यान अक्षयला येतीय आईची आठवण; व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.